Jayant Patil. 
सोलापूर

आमदार भालके यांची दोन्ही स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी आपण घेत आहोत : जयंत पाटील 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढणे आणि मंगळवेढा तालुक्‍यातील 35 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवणे हे आमदार भारत भालके यांचे स्वप्न होते. शेवटपर्यंत ते त्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांची ही दोन्ही स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचा एक सहकारी म्हणून आपण घेत आहोत. ही दोन्ही कामे मार्गी लावणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशा भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या. 

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार (कै). भालके यांच्या तिसऱ्या दिवसाचे विधी आज सकाळी भालके यांच्या सरकोली या गावी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाला. त्याप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. 

श्री. पाटील पुढे म्हणाले, आमदार भारत भालके हे आज आपल्यात नाहीत यावर आजही विश्वास बसत नाही. विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आमदार भालके सातत्याने मंत्रालयात येत होते. आजारी असल्यामुळे तुम्ही मंत्रालयात येऊ नका, आम्ही तुमची कामे मार्गी लावतो, असे आम्ही सर्वजण त्यांना सातत्याने सांगत होतो. परंतु, कारखान्याच्या कामगारांना आणि सभासद शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, काम मार्गी लागल्याशिवाय मी जाणार नाही, अशी त्यांची चिकाटी होती. 
दवाखान्यात आजारी असताना देखील भालके हे विठ्ठल कारखान्याच्या संदर्भात सातत्याने मोबाईलवरून पाठपुरावा करत होते. विठ्ठल कारखान्याचे धुराडे त्यांच्या चिकाटीमुळेच पेटू शकले. 

आमदार (कै.) भारत भालके यांचे पुत्र, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक, युवा नेते भगीरथ भालके, पुतणे व्यंकट भालके यांनी (कै.) भालके यांच्या तिसऱ्या दिवसाचे विधी पूर्ण केले. 

याप्रसंगी श्रद्धांजली व्यक्त करताना अनेकांनी, आमदार भालके यांच्या पश्‍चात सर्वांनी युवा नेते भगीरथ भालके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले. 

याप्रसंगी माजी आमदार दीपक साळुंखे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, उद्योगपती उत्तमराव फडतरे, श्री विठ्ठल कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, बबनराव आवताडे, डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, पंढरपूर मर्चंट बॅंकेचे अध्यक्ष नागेश भोसले, किरण घाडगे, संदीप मांडवे, शहर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष नागेश गंगेकर , राजाभाऊ उराडे, सुधीर धुमाळ यांच्यासह पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 

संपादक : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT