Jayesh's world record in Solapur 
सोलापूर

सोलापुरच्या जयेशचा जागतिक विक्रम 

सुस्मिता वडतिले

सोलापूर : येथील जयेश सरवदे हा गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकार्डमध्ये झळकला आहे. जयेशचे 12 वी पर्यंतचे शिक्षण सोलापुरात झाले. सोलापुरात गिटारचे प्रशिक्षण घेऊन तो लोणावळा येथील सिंहगड कॉलेज येथे बी. ई. कॉम्पुटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. सध्या त्याचे वय 22 आहे. शिक्षण घेत असतानाच त्याला गिटार वाजवण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे तो शिक्षण घेत गिटार वाजवतो. रोज कमीतकमी दोन तास आवर्जून गिटार वाजवतो. त्याने इच्छाशक्तीच्या बळावर यश मिळवले आहे. 
मुंबई येथील टुलीप स्टार हॉटेल जुहू येथे 24 जानेवारी 2020 रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओ या यूट्यूब चॅनल माध्यमातून "द फॉरगॉटम आर्मी आझादी के लिए' वेब सिरीजचे प्रमोशन करण्यात आले. बॉलिवूडचे नामांकित म्युझिक डायरेक्‍टर प्रिन्स मुल्ला कार्यक्रमाचे आयोजक होते. 
कार्यक्रमास "द फॉरगॉटम आर्मी आझादी के लिए' वेब सिरीजचे सर्व अभिनेते, कलाकार, अमेझॉन प्राईम व्हिडीओचे हेड, म्युझिक डायरेक्‍टर प्रीतम चक्रवर्ती व जगभरातून केनिया, दुबई, मलेशिया आदी देशातील रसिक प्रेक्षकांनी, मीडिया प्रतिनिधी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी सिरीजचे ख्यातनाम म्युझिक डायरेक्‍टर प्रीतम चक्रवर्ती यांच्या गाण्यांचे समूह गायन करण्यात आले. त्यासाठी 1046 गायकांची निवड करण्यात आली. यापूर्वी 950 गायकांची एकाच वेळी गायन करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला नोंद केलेली होती, परंतु आता ते रेकॉर्ड मोडून एकाचवेळी 1046 गायकांनी एकत्र गायन करून नव्या जागतिक विक्रमाची नोंद केलेली आहे. गायकांत सोलापूर येथील गीतानगरातील लोटस अपार्टमेंट येथे राहणारा जयेश सरवदे याने सहभाग घेऊन गिटार वादक कलाकृती सादर केली आणि सोलापूरचे नाव गाजवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT