Rail  sakal
सोलापूर

कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेसला हिरवा कंदील

सोलापूर विभागाकडून तयारी सुरू; प्रवाशांची झाली सोय

विजय थोरात

सोलापूर : कोरोनामुळे तब्बल अडीच वर्षे जागेवर थांबलेल्या कलबुर्गी- कोल्हापूर एक्स्प्रेसला रेल्वे बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार सोलापूर विभागाकडून तयारी सुरू झाली असून, लवकरच गाडी सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेच्या विश्वसनीय सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कलबुर्गी- कोल्हापूर एक्स्प्रेस सुरू होत असल्याने व दररोज धावणार असल्याने मिरज, कोल्हापूरकडे दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. दुसरीकडे, सोलापूर विभागाने देखील रेक तयार करण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. गाडी सुरू होणार असल्याने सोलापूरसह विविध भागांतून गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर या तीर्थस्थळी जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर मिरज, कोल्हापूरला जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, चाकरमान्यांना कलबुर्गी- कोल्हापूर एक्स्प्रेस सुरू होत असल्याने दिलासा मिळणार आहे. गाडीस एकूण १३ डबे असणार आहेत.

‘या’ स्थानकांवर थांबे

कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेसला गाणगापूर, अक्कलकोट, सोलापूर, कुर्डुवाडी, पंढरपूर, मिरज आणि कोल्हापूर या ठिकाणी थांबे असणार आहेत. ही गाडी कलबुर्गी स्थानकावरून सकाळी ६.४० मिनिटांनी निघेल तर सोलापूरला सकाळी ८.३० वाजता येईल तर कोल्हापूरला दुपारी २.१५ वाजता पोचणार आहे. दुपारी तीन वाजता कोल्हापूर येथून निघेल व सोलापूरला रात्री ९.०८ वाजता येईल. कलबुर्गीला रात्री १०.४५ वाजता पोचणार आहे.

ठळक बाबी...

- १३ डब्यांचा असणार रेक

- एक वातानुकूलित चेअर कार तर १० जनरल डबे

- गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची झाली सोय

- खासगी व एसटी बसच्या तुलनेत रेल्वे प्रवास स्वस्त

- प्रवाशांचे पैसे व वेळेची होणार बचत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळाचा नवा विक्रम! एका दिवसात २१६ विमानांची वाहतूक; ३३ हजार प्रवाशांचा टप्पा पार

Timber Smuggling: गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; ६० लाखांचे अवैध सागवान जप्त

Latest Marathi News Live Update : राज्यात आज कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

Krishna River Water Level : कोयना धरणातून 33 हजारांवर विसर्ग; कृष्णा नदीने ओलांडली 30 फुटांची पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

NMC MBBS Admission: दिव्यांग विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार साकार; एमबीबीएस प्रवेशासाठी एनएमसीची नवी मार्गदर्शक तत्त्वे दिव्यांगत्वच्या टक्केवारीऐवजी क्षमता आणि कार्यक्षमतेला महत्त्व

SCROLL FOR NEXT