दारू विकणारे हात लागले उद्योगाला sakal media
सोलापूर

दारू विकणारे हात लागले उद्योगाला

करकंब पोलिसांच्या मार्गदर्शनामुळे अवैध व्यवसाय केले बंद

सकाळ वृत्तसेवा

करकंब : अवैधरित्या गावठी दारू तयार करून विकणाऱ्या अनेक कुटुंबांचे समोपदेशन करून करकंब पोलिसांनी त्यांना किराणा दुकान, हॉटेल, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, मध गोळा करून विकणे आदींसारखे छोटे-छोटे व्यवसाय सुरू करून दिले आहेत. त्यामुळे करकंब परिसरात आता दारू विकणारे हात उद्योगाला लागल्याचे चित्र पहायला मिळू लागले आहे.

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलिस ठाण्यांतर्गत गावांमध्ये ’ऑपरेशन परिवर्तन’ मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अवैध हातभट्टी दारु निर्मिती करणारे व विक्री करणाऱ्यांचे समोपदेशन करुन त्यांचे मन परिवर्तन केले जात आहे. शिवाय त्यांना लहान-लहान उद्योग करायला प्रवृत्त केले जात आहे. या मोहिमेत करकंब पोलिसांना यश मिळत असून काही जणांनी दारू विक्रीला फाटा देत किराणा दुकान, हॉटेल व्यवसाय, मध विक्री, शेळी पालन व दुग्धव्यवसाय चालू केला आहे.

महिला बचत गटाच्या सुनीता देशपांडे यांच्या मदतीने पोलिसांनी हातभट्टी दारु निर्मिती व विक्री करणाऱ्या महिलांचे बचत गट तयार केले आहेत. त्यांची बॅंकेत बचत खाती उघडून या बचत गटाकडून कर्जरोखे घेवून लघु व्यवसाय सुरु करण्यास मदत केली आहे. याकामी सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश तारु यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक महेश मुंढे, पोलिस उपनिरीक्षक अजित मोरे, शशिकांत कवितकर, कैलास हरिहर, दीपक लेंगरे, स्वप्निल वाघमारे, सचिन गावडे, सचिन गावडे, रमेश फुगे, अमोल घुगे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातची SIT कडून सलग १०व्या दिवशी चौकशी

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणातील 'त्या' पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याने 65 जणांवर गुन्हा; तुमच्याही मोबाईलमध्ये 'ते' व्हिडिओ आहेत?

SCROLL FOR NEXT