Karmala Congress taluka Shivling Sukle passes away
Karmala Congress taluka Shivling Sukle passes away 
सोलापूर

करमाळा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शिवलिंग सुकळे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर) : करमाळा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शिवलिंग रामभाऊ सुकळे (वय 73) यांचे बुधवारी (ता.13) सकाळी दिर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर सोलापूर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. वरकुटे (मु) (ता. करमाळा) हे त्यांचे मुळ गाव होते. त्यांनी आपली राजकीय कार्यकिर्द कॉंग्रेस पक्षातून सुरू केली. ते शेवटीपर्यंत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहीले.
करमाळ्याच्या राजकारणात सुरवातीला त्यांनी कै. नामदेवराव जगताप यांच्याबरोबर काम केले. त्यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी मंञी कै. दिगंबरराव बागल यांच्या नेतृत्वाखाली काम केले होते. सध्या ते सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष, भटक्या विमुक्त जाती जमाती राज्य कार्यकारणी कार्याध्यक्ष या पदावर होते. 2006 मध्ये ते करमाळा पंचायत समितीचे सभापती झाले. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे ते विश्वासू कार्यकर्ते मानले जात होते. गेल्या काही वर्षापासुन ते सोलापूर येथे स्थायिक झाले होते. लहानपणापासून दगडफोडण्याचे काम करून ते आपले घर चालत होते. मोठ्या कष्टातुन ते पुढे आले होते.
खडी सोडण्याच्या व्यावसायातुन त्यांनी ठेकेदारी सुरू केली. सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात त्यांची कामे सुरू आहेत. वरकुटेचे सरपंच, वरकुटे विविध कार्यकारी विकास सोसायटीचे अध्यक्ष, जिल्हा दुध संघाचे संचालक, करमाळा पंचायत समितीचे सभापती अशी पदे त्यांनी भुषवली. अनेक वर्षे ते करमाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने करमाळा तालुक्यातील एक कष्टकरी समाजातुन पुढे आलेले नेतृत्व हरपल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमधुन व्यक्त होत आहे. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, तीन मुले, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT