Karmala DYSP Vishal Hire transferred Pimpri Chinchwad Assistant Commissioner Ajit Patil new DYSP of karmala sakal
सोलापूर

Solapur : करमाळ्याचे DYSP विशाल हिरेंची पिंपरी चिंचवड सहाय्यक आयुक्त पदी बदली तर अजित पाटील नवे DYSP

करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.विशाल हिरे यांची पिंपरी चिंचवड सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली

आण्णा काळे

करमाळा : करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.विशाल हिरे यांची पिंपरी चिंचवड सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे.तर डॉ. विशाल हिरे त्याजागी अहमदनगर ग्रामीण चे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांची करमाळा येथे बदली झाली.

महाराष्ट्र शासनाने उपअधीक्षक पदाच्या बदल्या बदल्यांचा आदेश ता.22 मे रोजी काढला आहे. या आदेशात या बदल्या झाल्या आहेत. डॉ.विशाल हिरे हे गेली चार वर्षे पासून करमाळा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहत होते.

कोरोना कालावधीत त्यांनी केलेली कामगिरी महत्त्वाची मानली जाते. करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने नेहमी त्यांनी उत्कृष्ट पद्धतीचे नियोजन केले संयमी आणि शांत पद्धतीने परिस्थिती हाताळणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख झाली होती. डॉ विशाल हिरे हे 2019 पासून करमाळा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहत होते.

2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार न होऊ देता निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन केले होते.करमाळा पोलीस उपविभागीय कार्यालया अंतर्गत करमाळा ,माढा ,कुर्डूवाडी, टेंभुर्णी हे पोलीस स्टेशन येतात या सर्व पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या गुन्हेगारी वरती आळा घालण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम राबवली. याशिवाय समंजस्याने वाद मिटवण्यावरती त्यांनी भर दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

West Bengal Politics: ‘तृणमूल’कडून झालेला छळ विसरलो नाही; सुवेंदू अधिकारी यांचा इशारा, राजकीय गुन्ह्यांची चौकशी होणार!

'मुलांना जन्माला घालण्यापेक्षा कुत्रा पाळा' शेफाली शाहचा सल्ला, तरुण पिढीला दिला 'हा' सल्ला

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

SCROLL FOR NEXT