Karmala Sakal
सोलापूर

Maratha Reservation : मराठा समाज आक्रमक! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्याच्या फोटोला काळे फासले

आरोग्य शिबिर या बॅनरवरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला कार्यकर्त्यांनी काळे फासुन मराठा समाजाचा रोष व्यक्त केला आहे.

आण्णा काळे

करमाळा - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी करमाळा तहसील कार्यालयासमोरी बॅनरवरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे फसले आहे.

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरंगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी करमाळा तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चक्रीय उपोषण सुरू असून आज चक्रीय उपोषणाचा पाचवा दिवस आहे.

या उपोषणासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहत आहेत. सोमवार ता. 30 ऑक्टोबर रोजी करमाळा तहसील कार्यालयासमोर शासनाच्या वतीने लावण्यात आलेल्या उत्सव नवराञीचा.... महाराष्ट्राच्या आरोग्याचा मोफत महाआरोग्य शिबीर हा बॅनर लावला आहे. तुळजापूर, जि. धाराशिव येथे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने हे आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराचा हा बॅनर आहे.

करमाळा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वार शेजारीच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी बॅनर लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी नेहमी शासनाच्या विविध योजनांचे माहिती देणारे बॅनर लावलेले असतात नवरात्र उत्सवानिमित्त आरोग्य खात्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महाआरोग्य शिबिराच्या जाहिरातीचा हा बॅनर लावण्यात आला आहे.

या बॅनरवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे फोटो आहेत याच फोटोला कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे.

आरोग्य शिबिर या बॅनरवरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला कार्यकर्त्यांनी काळे फासुन मराठा समाजाचा रोष व्यक्त केला आहे.

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे ठरावही करमाळा तालुक्यातील 40 पेक्षा जास्त गावांनी केले आहेत.

दोन दिवसापूर्वी करमाळा बस स्थानकातील एसटी बसेस वरील पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर नेतेमंडळींच्या फोटोला एक मराठा लाख मराठा.... मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे... कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देत काळे फसण्यात आले होते.

त्यानंतर आज सोमवार ता. 30 रोजी करमाळा तहसील कार्यालयाच्या समोर लावण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या बॅनरवरील फोटोला काळे फासले आहे.

मराठा समाजाच्या जीवावर राजकीय सत्ता भोगणाऱ्या मराठा समाजातील नेते मंडळी विषयी समाजातून रोज व्यक्त होत असून वेळीच मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी मराठा समाजातून होत आहे. करमाळा येथे सुरू असलेल्या चक्रीय उपोषणाला रविवार ता. 29 रोजी महिलांनी मोठी उपस्थिती दर्शवत घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे साडे (ता. करमाळा) येथे केंद्रीयमंञी नारायण राणे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, गुणरत्न सदावर्ते यांच्या पोस्टरला जोडेमार अंदोलन करण्यात आले. तसेच प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले.

करमाळा तालुक्यातील गावोगावी मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसुन येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT