Wild Leopard 
सोलापूर

भय इथले संपले नाही ! करमाळा तालुक्‍यात पुन्हा बिबट्याची दहशत; चार कुत्री केले ठार 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील वांगी परिसरात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या शुक्रवारी (ता. 18) बिटरगाव - वांगी परिसर येथे नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्यात आल्या. त्यानंतर संपूर्ण तालुक्‍याने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र पुन्हा आज शुक्रवारी (ता. 23) सायंकाळी वांगी नंबर एक येथे मयूर जाधव यांच्या वस्तीजवळ बिबट्याने चार कुत्री मारले आहेत. तर ज्या ठिकाणी राखुंडे वस्ती येथे बिबट्याला गोळ्या घालण्यात आल्या, त्याच परिसरातील शेतामध्ये बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. 

वांगी परिसरात असलेले ठसे हे बिबट्याचेच असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र, एका बिबट्याचा बंदोबस्त केल्यानंतर सध्या वावरत असलेल्या बिबट्यांबाबत वन विभागाच्या वतीने कोणत्याही ठोस उपाययोजना सुरू नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

एका बिबट्याला ठार मारण्यास जरी यश आले असले तरी गेल्या चार - पाच दिवसांपासून वांगी परिसरात बिबट्या असल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. या बिबट्याने चार कुत्री मारली असून, या भागातील वातावरण अतिशय भयभीत झाले आहे. मात्र वन विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारची दखल अद्यापही घेतली गेलेली नाही. जर वन विभागाने याची दखल घेतली नाही, तर या भागातील शेतकरी तीव्र आंदोलन करतील. 
- महेंद्र पाटील, 
शेतकरी, बिटरगाव वा, ता. करमाळा, जि सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

VAIBHAV SOORYAVANSHI: वय अवघं १५ वर्षं... पण विक्रमांची यादी मोठमोठ्या खेळाडूंना टक्कर देणारी वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत काय काय केलं?

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT