Student 
सोलापूर

पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे 16 विद्यार्थी बनले शिष्यवृत्तिधारक ! 

शुभजित नष्टे

पिलीव (सोलापूर) : पिलीव येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, पिलीवने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षेत घवघवीत यश मिळवले. प्रत्येक स्पर्धा परीक्षेत कर्मवीर विद्यालयाची बाजी ही कायम असते आणि या निकालातून विद्यालयाच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम दिसत आहे. विद्यालयातील इयत्ता पाचवीचे पाच विद्यार्थी व इयत्ता आठवीचे 11 असे एकूण 16 विद्यार्थी शिष्यवृत्तिधारक झाले आहेत. 

यामध्ये इयत्ता पाचवीमध्ये आकांक्षा चौरे (92.36 टक्के) राज्यस्तरीय ग्रामीणमध्ये गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक, शर्वरी बंगाळे (90.97) राज्यस्तरीय ग्रामीण गुणवत्ता यादीत दहावा क्रमांक, आसावरी माने (90.27) जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक, अलविया तांबोळी (86.80) जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत 34 वा क्रमांक, सायमा आतार (77.77) तालुका ग्रामीण गुणवत्ता यादीत 25 वा क्रमांक आणि इयत्ता आठवीमध्ये शनितेज पाटील (82.99) ग्रामीण जिल्हा गुणवत्ता यादीत 18 वा क्रमांक, संस्कारसिंग जामदार (76.87) तालुका ग्रामीण चौथा क्रमांक, प्रांजली जामदार (75.51), तालुका ग्रामीण सातवा क्रमांक, वाजिद मुलाणी (74.14) तालुका ग्रामीण आठवा क्रमांक, तनिष गांधी (73.46) तालुका ग्रामीण 11 वा क्रमांक, अभिजित मदने-पाटील (70.06) तालुका ग्रामीण 19 वा क्रमांक, आदित्य मारकड (68.02) तालुका ग्रामीण 25 वा क्रमांक, वैष्णवी तांबवे (66.66) तालुका ग्रामीण 33 वा क्रमांक, संस्कृती जामदार (66.66) तालुका ग्रामीण 36 वा क्रमांक, प्रतीक आर्वे (65.98) तालुका ग्रामीण 37 वा क्रमांक, अमृता खरे (62.58) तालुका यादीत क्रमांक. 

या निवडीबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालक विभाग प्रमुख कुलकर्णी, हिरके आणि मार्गदर्शक शिक्षक दीपक माने, वाघमारे, जाधव, ऐवळे, जरे, लिंगे, आठरे, आळंदे यांचे रयत शिक्षण संस्था, मध्य. विभागाचे चेअरमन संजीव पाटील, इन्स्पेक्‍टर कमलाकर महामुनी, सहाय्यक इन्स्पेक्‍टर मणेर, गोडसे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य संग्रामसिंह जहागीरदार, संभाजीराव भोसले, नारायणराव पाटील, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक- पालक संघ, ग्रामस्थ, मुख्याध्यापक साहेबराव लेंडवे, पर्यवेक्षक गायकवाड, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT