Pandharpur Railway Station
Pandharpur Railway Station sakal
सोलापूर

Kartiki Ekadashi Yatra : जातो माघारी पंढरीनाथा; तुझे दर्शन झाले आता.... जड अंत:करणाने भाविकांनी घेतला पंढरीचा निरोप

राजकुमार घाडगे

पंढरपूर - कार्तिकी एकादशीला चंद्रभागेतील स्नानाची पर्वणी व लाडक्या विठुरायाच्या दर्शनाने तृप्त झाल्यानंतर भाविक शुक्रवारी (ता.२४) द्वादशीच्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघाले होते. 'जातो माघारी पंढरीनाथाI तुझे दर्शन झाले आता II अशी तृप्त भावना व्यक्त करत लाखो भाविकांनी येथील रेल्वे स्थानक व चंद्रभागा बस स्थानकामध्ये गर्दी केली होती.

यंदाच्या कार्तिकी यात्रेला सुमारे अडीच ते तीन लाख भाविक पंढरीत दाखल झाले होते. कार्तिकी एकादशीला चंद्रभागेत स्नान केल्यानंतर अनेक संतांच्या दिंड्यांनी विठू नामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. एकादशीच्या दिवशी रात्रभर शहरातील विविध मठ, धर्मशाळा व मंदिर परिसरातील मोठ्या वाड्यांमधून हरि नामाचा जागर सुरू होता.

शुक्रवारी व्दादशीदिवशी पहाटेपासूनच भाविकांची एकादशीचा उपवास सोडण्याची लगबग सुरू होती. द्वादशीचा महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर भाविकांना परतीचे वेध लागले होते. पंढरीतील रेल्वे, एसटी आणि खासगी वाहनाने भाविक परतीच्या प्रवासाला जाताना दिसून येत होते.

तत्पूर्वी भाविकांनी आपल्या घरातील मंडळींसाठी प्रसाद म्हणून चिरमुरे, बत्तासे, बुंदीचे लाडू, यासह घरातील लहानग्यांसाठी खेळणी, दररोजच्या पूजेसाठी लागणारे हळद, कुंकू, बुक्का, अष्टगंध, गोपीचंदन, उदबत्तीपुडे इष्ट देवीदेवतांच्या फोटोची खरेदी केली होती. तदनंतर जड अंतकरणाने भाविकांनी परतीच्या प्रवासासाठी येथील चंद्रभागा बस स्थानक व पंढरपूर रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली होती.

एसटी महामंडळाने यंदा कार्तिक वारीसाठी सुमारे 2 हजार ७०० व्यवस्था केली आहे. त्यामुळे भाविकांना बस स्थानकामध्ये फार काळ ताटकळत बसावे लागले नाही. मोठ्या ग्रुपने आलेल्या भाविकांनी एस टी महामंडळाच्या ऍडव्हान्स बुकिंग सेवेचा देखील लाभ घेतला. या सेवेबाबत सुजान उद्धवराव डाके (रा.माजलगाव जि.बीड) 'सकाळ ' शी बोलताना म्हणाले, आम्ही ग्रुपने कार्तिकी वारी साठी आलो होतो.

परतीच्या प्रवासासाठी आम्ही संपूर्ण एसटी बसचे ॲडव्हान्स बुकिंग केले होते. त्यामुळे कोणतीही गैरसोय झाली नाही. दरम्यान रेल्वे प्रशासनाने देखील यंदाच्या कार्तिक यात्रेला मोठ्या प्रमाणावर जादा यात्रा स्पेशल रेल्वे गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या.

कर्नाटक कोकण व पश्चिम महाराष्ट्र भागातील भाविकांनी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. द्वादशी दिवशी येथील रेल्वे स्थानकावर परतीच्या प्रवासासाठी भाविकांची झुंबड उडाल्याचे चित्र दिसून आले.

एस टी महामंडळाने महिलांना एसटीच्या तिकिट दरामध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने आम्ही कार्तिक वारीला आलो होतो. परतीच्या प्रवासासाठी देखील आम्ही ऍडव्हान्स बुकिंग केले आहे.

- मिराबाई विजयसिंह गिरासे, रा. रजाळे, ता. व जि. नंदुरबार

कार्तिकी यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाने नियमित रेल्वे गाड्यांसह १५ जादा यात्रा स्पेशल रेल्वे गाड्या उपलब्ध केल्या आहेत. या सर्व रेल्वेगाड्यांना भाविक प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

- जे. पी. चनगौडर, स्टेशन प्रबंधक, रेल्वे स्थानक, पंढरपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT