Cheque Bounce 
सोलापूर

चेक बाउन्स प्रकरणी केजच्या व्यापाऱ्यास सहा महिने कारावास व दोन लाखांचा दंड ! 

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : मालवंडी (ता. बार्शी) येथील शेतकऱ्याचे शेतातील दहा टन द्राक्ष खरेदी करून केजच्या व्यापाऱ्याने दोन धनादेश दिले; पण दोन्हीही धनादेश अनादर झाल्या प्रकरणी माढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. शेख यांनी व्यापाऱ्यास सहा महिने कारावास व दोन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गफार सत्तार बागवान (रा. केज) असे शिक्षा झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. 

मालवंडी येथील शेतकरी द्राक्ष बागायतदार वामन जालिंदर काटे यांनी माढा न्यायालयात धनादेश अनादर प्रकरणी 2015 मध्ये फौजदारी दावा दाखल केला होता. 
काटे यांचे शेतातील दहा टन द्राक्ष केज येथील द्राक्ष व्यापारी गफार सत्तर बागवान यांनी खरेदी केले होते. व्यवहारापोटी बागवान यांनी काटे यांना दोन लाख रुपये रकमेचा धनादेश 25 जून 2015 रोजी वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बॅंक लि., शाखा केज या बॅंकेचा धनादेश दिला, तसेच उर्वरित रक्कम एक लाख 25 हजारांकरिता 25 जुलै 2015 रोजीचा दुसरा धनादेश दिला होता. दोन्ही धनादेश वामन काटे यांनी त्यांचे खाते असलेल्या बॅंक ऑफ इंडिया शाखा माढा येथे जमा केले असता दोन्ही धनादेश द्राक्ष व्यापारी गफार बागवान यांच्या खात्यावर धनादेश जमा होईल एवढी रक्कम शिल्लक नसल्यामुळे अनादरीत झाले. त्यामुळे फिर्यादी वामन काटे यांनी गफार बागवान यांच्याविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्‍ट कलम 138 प्रमाणे माढा येथील फौजदारी न्यायालयामध्ये फिर्याद दाखल केली. 

या प्रकरणी चौकशी होऊन न्यायालयाने गफार बागवान यास दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोषी धरून रक्कम रुपये दोन लाखच्या धनादेश प्रकरणी सहा महिने कारावास व धनादेश रकमेच्या दुप्पट रक्कम रुपये चार लाख नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश पारित केला. तसेच रक्कम रुपये एक लाख पंचवीस हजारचे धनादेश प्रकरणी चार महिने कारावास व 2 लाख 50 हजार रुपये नुकसान भरपाई पोटी फिर्यादीस देण्याबाबत आदेश केले आहेत. फिर्यादी काटे यांच्या वतीने ऍड. सोमनाथ सावंत व ऍड. महेश जाधव (बार्शी) यांनी काम पाहिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT