kidnapping case laur of mobile phone to 10 yera old boy police action suspect arrest  esakal
सोलापूर

Solapur Crime : 'तुला मोबाईल घेऊन देतो, सोलापूरला चल' अशी बतावणी; दहा वर्षाच्या मुलाचे अपहरण

संशयताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ : "तुला मोबाईल घेऊन देतो, सोलापूरला चल" अशी बतावणी करून एका दहा वर्षाच्या चिमुकल्याचे चिंचोली औद्योगिक वसाहतीतून अडीच महिन्यापुर्वी अपहरण झाले होते. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल होताच मोहोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकृटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून अपह्नत मुलाला तेलंगणा राज्यातून हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

दरम्यान यातील संशयताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या कामगिरी बद्दल मोहोळ पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोली औद्योगिक वसाहतीत किसन दुबया सामलेटी हा मजूर राहत होता. तो मिळेल ते काम करून आईस्क्रीम विकण्या सारखे व्यवसाय करून रोजी रोटी भागवत होता.

त्याच्याच शेजारी पिडीत मुलगा व त्याचे कुटुंबीय राहत होते. अत्यंत गरीब कुटुंब असल्याने तेही मोल मजुरी करीत होते. शेजारी राहण्यासाठी असल्याने पिडीत मुलाची व किसन ची दोस्ती झाली होती. दरम्यान किसन याने तुला मोबाईल घेऊन देतो असे अमिष दाखवून पिडीत मुलाला घेऊन पळून गेला.

नातेवाईकांनी शोधाशोध केली मात्र तो मिळून आला नाही. अखेर 11 जानेवारी रोजी कुणालचे आजोबा प्रकाश कोणचकोर यांनी नातू हरविल्याची तक्रार मोहोळ पोलिसात दाखल केली होती. सुरुवातीला या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील चवरे व पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी केला होता. काही दिवसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार हा गुन्हा पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद ढावरे यांच्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला.

दरम्यान पोलीस उपनिरीक्षक खारगे व पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद ढावरे यांनी या गुन्ह्याचा तपास चिंचोलीकाटी औद्योगिक वसाहत, बिडी घरकुल सोलापूर, लातूर, पंढरपूर, तुळजापूर, तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील बोधडा या ठिकाणी जाऊन संशयीत लोकांकडे विचारपूस करून संशयित किसन व पिडीत मुलाचा शोध घेतला.

तसेच इतर संशयतांचे मोबाईलचे सीडीआर व एसडी आर यांचा सखोल अभ्यास करून त्यातील एका मोबाईलचे लोकेशन तपासले असता ते लोकेशन तेलंगणा राज्यातील विकाराबाद या ठिकाणचे असल्याचे समजले.

दरम्यान पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या आदेशान्वये विकाराबाद या ठिकाणी जाऊन संशयीताच्या मोबाईल नंबरच्या संपर्कात असणाऱ्या लोकांची माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेऊन संशयित किसन व पिडीत मुलाच्या बाबत चौकशी केली असता, किसन व पिडीत हे रंगारेड्डी या ठिकाणी एका हॉटेलवर व भंगार दुकानात काम करीत असल्याची माहिती दिली.

त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता पिडीत हा कचऱ्याच्या ढिगातील प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करीत असल्याचे निदर्शनास आले. संशयित किसन ला ताब्यात घेतले व पिडीत मुलाला तुला न्यावयासाठी आम्ही सोलापूरहून आल्याचे सांगताच त्याने धायमोकलुन रडत पोलिसांना मिठी मारली.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव,डीवायएसपी भारती, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद ढावरे सायबर सेलचे धीरज काकडे यांनी केली. मोहोळ पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून लहानग्याचे जीवन उद्ध्वस्त होण्या पासुन वाचविल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान या प्रकरणातील ताब्यात घेतलेला संशयित किसन सामलेटी हा विचित्र मनोवृत्तीचा असून तो एक उत्तम पेंटर आहे. त्याचे इतर नातेवाईक सोलापूर व चिंचोली एमआयडीसी परिसरात आहेत, परंतु त्याला कोणीही याच्या मनोवृत्तीमुळे थारा देत नाहीत. त्याने पीडित मुलाला तुझे आई-वडील निधन पावले आहेत, त्यामुळे तुला आता इथेच राहावे लागेल गावाकडे जायचे नाही अशा प्रकारची मानसिकता त्याच्या मनावर बिंबवत होता तो एकलकोंडा आहे.

सुधीर खारगे ,पोलीस उपनिरीक्षक मोहोळ पोलीस ठाणे

मोहोळ पोलिसांनी तीन महीन्याच्याअथक परिश्रमाने माझ्या मुलाला शोधून काढले, मुलाला बघताच माझा जीव मोठा झाला, पोलिसांचे करावे तेवढे अभिनंदन थोडेच आहे.

पिडीत मुलाची आई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

SCROLL FOR NEXT