Kola State Bank Bank Manager Raju Narayani said that farmers need to switch to organic farming. 2.jpg 
सोलापूर

रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचे प्रदूषण

विनोद देशमुख

कोळा (सोलापूर) :  रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे व सेंद्रिय खतांच्या शेतीच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये घटत्या प्रमाणामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोळा स्टेट बॅंकेचे बॅंक मॅनेजर राजू नारायणी यांनी जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित केलेल्या शेतकऱ्यांच्या सन्मान कार्यक्रमावेळी केले. 

यावेळी कोळा विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विनोद देशमुख, एनजीओ संघटनाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संतोष कारंडे, उद्योगपती अशोक माळी, वनरक्षक नितीन देशमुख, महादेव खंडागळे, स्टेट बॅंक मिनी शाखेचे दत्ता कुदळे, सचिन मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. कोळा स्टेट बॅंक यांच्यामार्फत जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून कोळा भागातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रगतशील शेतकरी दत्तात्रय देशमुख, राजू माळी यांचा सत्कार शेतकऱ्यांच्या घरी जाऊन करण्यात आला. 

पुढे नारायणी म्हणाले, बिघडलेली जमिनीचे आरोग्य सुधारणे, खताचा समतोल वापर करणे, जमिनीचे प्रदूषण कमी करणे व जमीन सुधारण्याच्या विविध उपाययोजना करणे याबाबत शेतकऱ्यांनी जागृत असणे गरजेचे आहे. याचबरोबर गावात पत, बॅंकेत पत व घरात एकमत असणे गरजेचे आहे. आपल्या भागातील कोळा स्टेट बॅंक शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभी असेल असे आश्वासन यावेळी दिले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Campaign : निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला अचानक ब्रेक; महाराष्ट्र राजकारण हादरले

NCP leaders meet Devendra Fadnavis : अजित पवार यांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल काय म्हणाले...

Latest Marathi News Live Update : कल्याण डोंबिवलीत महापौर पदासाठी रस्सीखेच

Akola Mayor Election : एमआयएमच्या तटस्थ भूमिकेमुळे सभागृहात राडा! काँग्रेसच्या नगरसेवकांबरोबर वाद, नेमकं काय घडलं?

Budget 2026: आतापर्यंत 'या' अर्थमंत्र्यांनी सादर केले सर्वाधिक अर्थसंकल्प

SCROLL FOR NEXT