Kondbavit appears A fund of duty, not help 
सोलापूर

कोंडबावीत दिसून येतोय मदत नव्हे कर्तव्याचा फंडा

सकाळ वृत्तसेवा

लवंग (ता. माळशिरस, जि. सोलापूर) ः पै.आबासाहेब वाघमारे पाटील मित्र परिवाराच्या वतीने "मदत नव्हे,कर्तव्य" या भावनेतून कोंडबावी (ता. माळशिरस) व परिसरातील 850 लोकांची आरोग्य तपासणी तसेच 4 हजार 500 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक होमिपॅथिक आर्सेनिक अल्बम 30 या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.


तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ रामचंद्र मोहिते, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथिचे उपाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड, भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष डॉ. अक्षय वाईकर, डॉ विजय निलटे, डॉ. बबन ताम्हाणे यांच्या हस्ते औषधांचे वाटप करण्यात आले.


याप्रसंगी प्रास्ताविकात चिरंजीव वाघमारे यांनी पै.आबासाहेब वाघमारे पाटील मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत "मदत नव्हे कर्तव्य' या भावनेतून कोरोना या आजारापासुन वाचण्यासाठी जनतेला दिलासा म्हणून कोंडबावी या गावातील सर्व नागरिकांची थर्मल स्कॅन द्वारे तपासणी,रक्तदाब तपासणी करून मोफत होमिओपॅथिक औषधांचे वाटप करत असल्याचे सांगत भविष्यात रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबिर घेऊन तसेच जीवनावश्‍यक वस्तुंचे वाटप करणार असल्याचे सांगितले.


डॉ. मोहिते म्हणाले कोरोनाला न घाबरता त्याच्याबरोबर जगायला शिकले पाहिजे. आपणच आपले रक्षक याप्रमाणे शासकीय नियमांचे पालन करावे. डॉ. गायकवाड यांनी होमिओपॅथी शास्त्राचे महत्व सांगून कारोनाला रोखण्याची क्षमता होमिओपॅथिमध्ये असल्याचे सांगितले. 


यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष डॉ. अक्षय वायकर, डॉ. विजय निलटे, डॉ. हर्षवर्धन गायकवाड, डॉ. प्रमोद गायकवाड, डॉ. विशाल बळवंतराव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, शिवाजी धुमाळ,तेजस वाघमारे,सूरज वाघमारे,राहुल वाघमारे,सतीश यादव,मोहन वाघमारे,सुदर्शन गायकवाड ,विष्णु गायकवाड,ऋतुराज गायकवाड,शिरिषकुमार देशमुख,कुलदीप गायकवाड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन माउली वाघमारे यांनी केले. आभार तुकाराम झुरळे यांनी मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission: 'एसआयआर'ला सुप्रीम कोर्टाचे कायदेशीर कवच; अंतर्गत टिपण्या म्हणजे संस्थात्मक मतभेद नव्हेत! मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Asian Games 2026: राही सरनोबतचा एक 'निशाणा' चुकला अन् भारताचे पदक गेलं; 'Frame hit' चा फुल ड्रामा, ५५ हजार भरून अपील केले पण...

बाबो! विद्या बालनने सगळ्यांसमोर पती सिद्धार्थला केलं किस, रोमँटिक लिपलॉकचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Mumbai News: कोपर्डी प्रकरणी उच्च न्यायालय करणार घटनास्थळाची पाहणी; प्रत्यक्ष पडताळणीचा निर्णय

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT