Mayur Chavan 
सोलापूर

यालाच निसर्ग म्हणतात ! चक्क कोतवाल पक्ष्याने बाहेर काढले मयूर चव्हाण यांना मृत्यूच्या दाढेतून 

किरण चव्हाण

माढा (सोलापूर) : पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी या पृथ्वीवरील सर्वच सजीवांना जगण्याचा अधिकार निसर्गाने दिला आहे आणि हे सर्वच सजीव एकमेकांच्या सहकार्याने जगत आहेत. अनेकवेळा या सर्व सजीवांत जास्त बुद्धिमान असलेल्या माणसाने प्राण्यांचे, पक्ष्यांचे प्राण वाचवले, अशा आशयाच्या घटना आपण वाचतो अथवा ऐकतो. मात्र उंदरगावातील (ता. माढा) पक्षी निरीक्षक व इतिहासाचे अभ्यासक मयूर चव्हाण यांचे प्राण कोतवाल पक्ष्याच्या सजगतेमुळे वाचल्याची घटना घडली आहे. 

ही घटना तीन दिवसांपूर्वी मयूर चव्हाण यांच्या घराच्या परिसरात घडली असून, पक्ष्यांचे आपल्या आसपास वावरणे किती फायद्याचे ठरते, याचे महत्त्व मानवाला पटवून द्यायला ही घटना पुरेशी आहे. 

मयूर चव्हाण यांनी शब्दबद्ध केलेली ती घटना अशी : सकाळी सकाळी झाडांना पाणी देत असताना गवतातून साचलेल्या पाण्यात काहीतरी बुडबुडले. त्या हालचालीने "वसंतराणी / टबोबिया' या फुलझाडांच्या फांद्यांवर चुळबुळत असलेला "वटवट्या' पक्षी "टिवऽऽटिवऽऽ' करीत एकाएकी उडाला, तशी जवळच्या चिंचेच्या झाडावर बसलेली पाखरं फडफडली व विशेषतः "कोतवाल' या दुहेरी शेपटी असलेल्या गडद काळ्या रंगाच्या पक्षी समूहाने नेटानं आवाज करायला व माझ्याभोवती रिंगण घालायला सुरवात केली. पक्ष्यांबद्दलचे थोडेफार ज्ञान असल्यामुळे या आक्रांतावरून मी ओळखलं, की काहीतरी गडबड नक्कीच आहे आणि तसेच झाले. 

गवतातून "भुजंगराजा'ची (सापाची) पाठ दिसली. अक्षरशः दहा पावलं मागे सरकलो मी! मग भुजंग महोदय बाहेर आले, इकडे तिकडे पाहून सुळसुळत माळरानानं निघूनही गेले, काहीच न झाल्यासारखे ! आमच्यात अंतर होतं तीन-चार फुटांचं ! फणीच्या एकदम ऍक्‍युरेट रेंजमधे होतो मी ! जर वटवट्या पक्षी उडाला नसता व कोतवालांनी ओरडत झाडांवरून रिंगण घातले नसते, तर बहुधा माझ्यावर भुजंगाची फणा पडून दंश झाला असता अन्‌ कदाचित जीवावरही बेतला असता. 

म्हणून आपण अनेक सजीवांची हिस्सेदारी निसर्गातून घेतो. पण या पक्षी - प्राण्यांची हिस्सेदारी माणूस कधी देणार? 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात सोशल मीडियावर चाईल्ड मोड येणार? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण शिफारस; ''इंटरनेट हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार..''

मराठवाड्यात FDA ची धडक कारवाई! व्हेज-नॉनव्हेज मिक्स, झुरळांचा सुळसुळाट; डोमिनोज आउटलेटचा परवाना रद्द

Latest Marathi News Live Update : जुहूमध्ये अभिनेता अजय देवगणच्या बंगल्यावर महापालिकेची मोठी कारवाई, अनधिकृत बांधकामाचे काही भाग पाडले

Crime News: श्रीरामनगरमध्ये ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; बारा तासाच्या आत चौघांना अटक

दोन थोबाडीत माराव्याश्या वाटत होत्या... ललित प्रभाकरला पहिल्यांदा कसाबच्या भूमिकेत पाहिल्यानंतर काय म्हणाले उज्ज्वल निकम?

SCROLL FOR NEXT