vanraj new.jpg 
सोलापूर

व्हटकर क्रिकेट स्पर्धेत केपी क्रिकेट संघ अंतिम फेरीत 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर : येथे सुरु असलेल्या व्हटकर क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात केपी संघाने साउथ सोलापूरचा 49 धावांच्या फरकाने पराभव करीत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. 
कर्णिक नगरातील माजी खासदार स्व. लिंगराज वल्याळ मैदानावर या सोळा वर्षाखालील वयोगटासाठी या स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये अ गटात साऊथ सोलापूर, एसएसआय क्रिकेट ऍकॅडमी, जामश्री क्रिकेट ऍकॅडमी, बीएन क्रिकेट ऍकॅडमीचा समावेश होता. तर ब गटात मॉडेल क्रिकेट ऍकॅडमी, बीएससी स्पोर्टस, मास्टर क्रिकेट ऍकॅडमी व केपी क्रिकेट ऍकॅडमीचा समावेश होता. 
साखळी सामन्यानंतर साऊथ सोलापूर, मॉडेल क्रिकेट ऍकॅडमी, केपी क्रिकेट ऍकॅडमी व मॉडेल क्रिकेट संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. पहिला उपांत्य सामना केपी संघ व साउथ सोलापूरमध्ये शनिवारी (ता.30) रोजी खेळवण्यात आला. यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करत केपी संघाने सात गडयाच्या बदल्या वीस षटकामध्ये 174 धावा काढल्या. त्यामध्ये वनराज जाधवने सर्वाधिक 55 धावा केल्या. संस्कार बबेने 37 धावा तर सुजल जाधव याने 25 धावा काढत संघाची कामगिरी अधिक भक्कम केली. या आव्हानाला उत्तर देताना साउथ सोलापूरचा संघ केवळ 125 धावात सर्वबाद झाला. अर्शान शेख यांने 25 धावा तर सुजत चिलवेरी याने 30 धावा काढत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. केपी संघाच्या श्रेयस सुरवसे याने तीन गडी बाद करत चमकदार कामगिरी केली. हा सामना 49 धावांनी जिंकून केपी संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. वनराज जाधव हा सामनावीर ठरला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT