Solapur Crime sakal
सोलापूर

Solapur Crime News : कुमठा नाका परिसरातील दगडफेकप्रकरणी ११ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी

गुमास्ता सोसायटीजवळ येऊन ११ जणांनी अंदाधुंद दगडफेक करून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. याप्रकरणी ११ जणांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : येथील कुमठा नाका परिसरातील गुमास्ता सोसायटीजवळ येऊन ११ जणांनी अंदाधुंद दगडफेक करून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. फिर्यादी ऋषिकेश संजय घोलप (रा. बापूजीनगर) यांच्या वडिलांना जातिवाचक शिवीगाळ केली.

याप्रकरणी ११ जणांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने एक दिवसाची (शुक्रवारपर्यंत) पोलिस कोठडी ठोठावली आहे.

गुन्ह्यातील संशयित आरोपी विशाल बाबावाले याने फिर्यादी ऋषिकेश याला फोनवरून अर्वाच्य शिवीगाळ केल्याने विचारणा केली, त्यावेळी तू बाहेर भेट तुला दाखवतो असा दम दिला. त्यानंतर दुसरा संशयित आरोपी आदित्य लंगडेवाले याने आम्ही भांडण आपसात मिटवू म्हणून विजापूर वेस येथे गेल्यावर विशाल बाबावाले फिर्यादीच्या अंगावर धावून आला आणि त्याने शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ केली. ऋषिकेश याच्या मित्राने भांडण सोडविले व पुन्हा फिर्यादी व त्याचा मित्र कुमठा नाका येथे गेले.

त्यावेळी बुधवारी मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास तीन दुचाकीवरून विशाल बाबावाले, आदित्य लंगडेवाले, विवेक दत्तात्रय पारसवार, किरण धनेवाले, अंकुश व इतर सहाजण त्याठिकाणी आले. त्यांनी शिवीगाळ सुरू करून लाथाबुक्क्यांनी व सिमेंटच्या चौकटीच्या तुकड्यांनी मारहाण सुरू केली.

दगडफेक करून दुखापत केली. त्यांनी अंदाधुंद दगडफेक करून आजूबाजूला दहशतीचे वातावरण निर्माण केले आणि काहीवेळाने ते निघून गेले. त्यांनी घरासमोरून जातानाही आरडाओरड करून वडिलांना जातिवाचक शिवीगाळ केली, असेही फिर्यादीत नमूद आहे. संशयितांविरुद्ध ॲट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलिस आयुक्त अजय परमार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT