Kurduwadi Voting
Kurduwadi Voting 
सोलापूर

कुर्डुवाडीमध्ये दुपारी तीनपर्यंत शिक्षकसाठी 68.72 तर पदवीधरसाठी 40.99 टक्के मतदान 

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : कुर्डुवाडी शहरातील मतदान केंद्रांवर दुपारी 3 पर्यंत शिक्षक मतदार संघासाठी 68.72 टक्के तर पदवीधर मतदार संघासाठी 40.99 टक्के मतदान झाले. 

येथील नगरपालिका प्राथमिक शाळेत शिक्षक मतदार संघासाठी एक मतदान केंद्र तर पदवीधरसाठी तीन मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. दुपारी तीनपर्यंत शिक्षक मतदार संघासाठी 259 मतदारांपैकी 178 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर पदवीधर मतदार संघासाठी 1 हजार 322 मतदारांपैकी 542 मतदारांनी हक्क बजावला. 

मतदान प्रक्रियेच्या वेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रवेशद्वारावरच नगरपालिकेच्या वतीने मतदारांच्या हातावर सॅनिटायजेशन करण्यात येत होते. तापमान मोजण्यात येत होते. सकाळी पदवीधर मतदार केंद्रापेक्षा शिक्षक मतदार केंद्रावर मतदानाची टक्केवारी जास्त होती. साधारणपणे सकाळी 11 नंतर पदवीधरच्या केंद्रावर मतदारांची रांग लागली होती. मतदान केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. 

पसंतीक्रम देण्यात लागतोय उशीर 
मतपत्रिका मोठी असल्याने प्रत्येक मतपत्रिकेची योग्य पद्धतीने घडी घालणे, एकापेक्षा अनेक उमेदवारांना पसंतीक्रम देता येत असल्याने अनेक मतदारांना मतपत्रिकेवरील उमेदवारांची नावे वाचून त्यावर पसंतीक्रम देण्यास उशीर लागत असल्याचे चित्र होते. त्यामुळे अनेक मतदारांना ताटकळत थांबावे लागत होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT