सोलापूर : राज्यात 15 डिसेंबरनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली गेली असतानाही शहर- ग्रामीणमधील कोरोना टेस्टची संख्या वाढलेली नाही. ग्रामीण भागात दररोज सरासरी दोन हजारांहून अधिक संशयितांची कोरोना टेस्ट केली जाते तर शहरात पाचशेहून अधिक जणांची टेस्ट होते. मात्र, आज शहर- जिल्ह्यातील एक हजार 590 संशयितांचीच टेस्ट पार पडली. त्यात शहरात 16 बाधित आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीणमध्ये 84 पॉझिटिव्ह सापडले असून चौघांचा मृत्यू झाला आहे.
शहरात 'या' ठिकाणी सापडले नवे रुग्ण
वैष्णवी नगर, ऋषी रेसिडेन्सी (सैफूल), हाजी हजरत खान चाळ (मुरारजी पेठ), भवानी पेठ, अवंती नगर, बिलाल नगर, भाग्यलक्ष्मी पार्क (जुळे सोलापूर), उमा गृहनिर्माण संस्था, लक्ष्मी पेठ (विष्णू मिल कंपाउंड), ग्रामपंचायत कार्यालय (शेळगी), गवळी वस्ती (लक्ष्मी पेठ), लोकमान्य नगर (होटगी रोड), मंजुषा सोसायटी (विकास नगर) आणि सेटलमेंट फ्रि कॉलनी येथे नव्या 16 रुग्णांची आज भर पडली आहे. तर हाजी हजरत खान चाळ परिसरातील 73 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या संपर्कातील 139 संशयित होम क्वारंटाईन तर 40 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. 29 जण होम आयसोलेशनमध्ये असून शहरात आता 431 रुग्ण राहिले आहेत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी को- मॉर्बिड रुग्ण कोरोनाचे बळी ठरु नयेत म्हणून 'कुटूंब माझी जबाबदारी' मोहीम सुरु केली. तरीही को- मॉर्बिड रुग्णच कोरोनाचे बळी ठरु लागले आहेत. आज शहर- ग्रामीणमध्ये पाच जणांचा कोरोनाने बळी घेतला. त्यातील सर्वच रुग्ण 65 वर्षांवरील आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील तीन लाख 41 हजार 716 संशयितांमध्ये आतापर्यंत 36 हजार 346 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. आज येर्ले (ता. बार्शी) येथील 65 वर्षीय महिलेचा, वडाळ्यातील (ता. उत्तर सोलापूर) 83 वर्षीय पुरुषाचा, लक्ष्मी टाकळीतील (ता. पंढरपूर) 72 वर्षीय पुरुषाचा आणि टेंभूर्णीतील (ता. माढा) 62 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज अक्कलकोट तालुक्यात एक, बार्शीत 15, करमाळ्यात आठ, माढ्यात 13, माळशिरसमध्ये 21, मोहोळमध्ये पाच, पंढरपूर तालुक्यात 17, सांगोल्यात तीन आणि दक्षिण सोलापुरात एक रुग्ण आढळला आहे. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे अक्कलकोट व मंगळवेढ्यात एकही रुग्ण आढळला नाही.
ठळक बाबी...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.