Gouri 
सोलापूर

लक्ष्मी आली लक्ष्मी, सोन्याच्या अन्‌ गाईवासराच्या पावलाने ! घरोघरी झाले गौरी आवाहन 

श्याम जोशी

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : "लक्ष्मी आली लक्ष्मी... कशाच्या पावलाने आली... धनधान्याच्या, सोन्याच्या, अलंकाराच्या, पुत्रपौत्रांच्या अन्‌ गाईवासराच्या पावलाने...' अशा संवादाद्वारे थाळीसह घंटानाद करीत महिलांनी घरातील प्रत्येकांच्या सहभागाने आज (ता. 25) आपापल्या घरी महालक्ष्मी (गौरी)चे उत्साहात आवाहन केले. 

गणेश चतुर्थीनंतर तीन दिवसांनी भाद्रपद सप्तमीला गौरी आवाहन केले जाते. शास्त्रानुसार गौरी आवाहन अनुराधा नक्षत्रावर करण्याचा प्रघात असल्याने आज दुपारी 1 वाजून 59 मिनिटांनंतर आपापल्या सोयीने घरोघरी महालक्ष्मींचे आवाहन करण्यात आले. यासाठी घरोघरी गौरी आगमनानिमित्त जोरदार तयारी करण्यात आली होती. घरातील स्वच्छतेसह दारात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दाराला आंब्याच्या फाट्याचे व फुलांचे तोरण बांधण्यात आले होते. प्रवेशद्वारापासून घरातील देवघरापर्यंत रांगोळीने पावले काढण्यात आली होती. त्याच पावलावरून चालत लक्ष्मी आपल्या घरी येते अशी संकल्पना याद्वारे व्यक्त करण्यात येते. 

अनेकांनी महालक्ष्मीच्या आवाहनासाठी दिवेलागणीचा म्हणजेच सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजताचा मुहूर्त निवडला होता. प्रवेशदारातून लक्ष्मीच्या मुखवट्याला हातात घेत महिलांनी "लक्ष्मी आली लक्ष्मी... कशाच्या पावलाने आली... धनधान्याच्या, सोन्याच्या, अलंकाराच्या, पुत्रपौत्रांच्या अन्‌ गाईवासराच्या पावलाने...' अशा संवादाद्वारे गौरींचे उत्साहात आवाहन केले. या वेळी घरातील सदस्यासह बच्चेकंपनीने थाळीसह घंटानाद केला. प्रवेशदारापासून रांगोळीने काढलेल्या प्रत्येक पावलावर लक्ष्मीचा मुखवटा टेकवत घराच्या उंबरठ्यापर्यंत आणला गेला. येथे धान्याने भरलेले मापही या लक्ष्मीच्या मुखवट्याकडून ओलांडण्यात आले. यावेळी पुन्हा महिलांनी "लक्ष्मी आली लक्ष्मी... कशाच्या पावलाने आली... सोन्याच्या पावलाने आली... कुणाच्या घरी आली... (त्या घरमालकाचे नाव घेत) यांच्या घरी आली' असा संवाद करत लक्ष्मीच्या मुखवट्यांना घरात आणले. 

लक्ष्मीचे मुखवटे देवघरासमोर ठेवून दूधसाखरेचा नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी उपस्थित सुवासिनींना हळदी-कुंकू लावून साखर वाटण्यात आली. अनेकांच्या घरी त्यानंतर महालक्ष्मीसाठी मंडप, आरास करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अनेकांच्या घरी लक्ष्मीचे मुखवटे आणल्यानंतर लगेच आडण्या किंवा कोथळ्याद्वारे लक्ष्मी उभ्या करण्यात आल्या. त्यांचे पंचोपचारे पूजा करताना त्यांना साडी नेसवणे, दागिने परिधान करणे, पुष्पहार अर्पण करणे, आगाडा दुर्वा वाहणे, धूप, दीप, नैवेद्यासह विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी अनेकांच्या घरी प्रथेनुसार भाजीभाकरी किंवा दूधसाखर किंवा बेसनाचे लाडू असा नैवेद्य दाखवून महारती करण्यात आली. 

आज दिवसभर गौरीपूजन तर गाठी घेणे उद्या साडेबारानंतर 
महालक्ष्मी (गौरी)चे पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर भाद्रपद शुध्द अष्टमीला केले जाते. बुधवारी दिवसभर अष्टमी असल्याने गौरीपूजन दिवसभर करता येणार आहे. तर गौरी विसर्जन म्हणजेच गाठी घेण्याचा विधी मूळ नक्षत्रावर गुरुवारी (ता. 27) दुपारी 12 वाजून 37 मिनिटांनंतर करावा लागणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT