ST.png 
सोलापूर

.....अन्‌ शेतकऱ्यांच्या बांधावर शेतमाल नेण्यासाठी धावली 'लालपरी' 

दयानंद कुंभार

वडाळा(सोलापूर)ः एसटीची मालवाहतूक सेवा आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरू लागली आहे. शेतकऱ्यांना ही सेवा उपलब्ध व्हावी व त्यांचा माल बाजारात जाण्याच्या दृष्टीने मोठा प्रयत्न एसटीने केला आहे. परवडणारे दर व चांगली सेवा या गोष्टी राखत एसटीने शेतीमालाची वाहतूक सूरू केली आहे. नान्नज येथील शेतकरी संदेश जाधव यांच्या नर्सरीतून द्राक्षाची रोपे नेण्यासाठी एसटी गाडी चक्क त्यांच्या शेताच्या बांधावर पोहोचली. या सेवेमुळे शेतकरी देखील चकित झाले. 

कोरोना मुळे सर्वत्र अनेक निर्बंध आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाही याचा फटका बसत आहे. भाजीपाला वाहतुक अथवा इतर कृषी संबंधित वाहतुक असो यामध्ये शेतकरी भरडला जात आहे. मात्र उत्तर सोलापूर तालुक्‍यात अगोदर द्राक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नान्नज आता द्राक्षे नर्सरी (हुंड्या) तयार करण्यासाठी प्रसिद्ध झाले आहे. येथील रोपे महाराष्ट्रभर विकली जातात. 

सध्या लॉकडाउनमुळे खासगी वाहतूकदार ही वाहतुकीस धजेनात. यामुळे बीड पाटोदा येथील शेतकरी भारत गरझे यांनी कलमी द्राक्षे रोप नान्नज मध्ये खरेदी केली आणि वाहतुकीसाठी एस.टी. महामंडाळाची एसटी बार्शी डेपो मधून बुक केली. तेव्हा रोपे नेण्यासाठी लालपरी चक्क शेतकऱ्यांच्या बांधावर आली. एरव्ही रस्त्यावर धावताना पाहणारांना याचे कुतुहुल वाटले. नान्नज मधील युवा शेतकरी संदेश जाधव यांनी त्यांच्या नर्सरीमधील द्राक्षांची तीन हजार रोपे लालपरीतून रवाना केले. 

शेतमालाचे नुकसान एसटीमुळे टळेल 
"अशा एस. टी. सेवेचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. सध्या भाजीपाला व शेतमाल बाजारपेठेत नेण्यास अडचणी आहेत. त्यामुळे एसटीची सेवा उपयोगी आहे. 
- संदेश जाधव, नान्नज, ता.उत्तर सोलापूर द्राक्षे नर्सरी धारक  

संपादनः प्रकाश सनपूरकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT