सोलापूरः कुछ लम्होंको गम के दायरे फैलते हैं , फिर पानी पानी से मिल जाता है
दायमी फुर्कत का हर जख्म, चार दिनोमें सिल जाता है,
या अब्दूल साज यांच्या काव्य ओळीसह दिवंगत उर्दू साहित्यीकांच्या काव्याचा कार्यक्रम रंगला.
अशरा-ए-उर्दू निमित्त येथील खादिमाने उर्दू फोरमच्या वतीने दिवंगत उर्दू साहित्यीकांच्या स्मृती जागवणारे यादे रफ्तंगा कवी संमेलन घेण्यात आले. त्यामध्ये देशभरातील नामवंत उर्दू साहित्यिकांनी हजेरी लावली.
सुरुवातीला व्यंग व दखनी कवी सिराज सोलापुरी यांनी कवी अब्दुल अहद साज यांना आदरांजली वाहीली.
मुंबई विद्यापीठाचे डॉ. कमर सिद्दीकी यांनी कवी प्रा. डॉ. साहिब अली यांच्या साहित्याचा परिचय करुन दिला.
ज्येष्ठ कवी आनंद दुतशी गुलजार देहलवी चे काव्य सादर करताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नजीर फतेहपुरी यांनी,
इल्म, फन व अदब का जिया छोड जाऊंगा,
उर्दू की खुशबुओं का जहॉं छोड जाऊंगा,
या ओळी सादर केल्या.
कर्नाटक उर्दू अकादमीचे सदस्य कवी डॉ. माजिद दागी यांनी आंतरराष्ट्रीय किर्तीचे व्यंग्यकार पद्मश्री डॉ. मुजतबा हुसेन यांच्या काव्याची माहिती दिली.
प्रसिध्द कवी प्राध्यापक डॉ. सलीम मोहयोद्दीन यांनी मराठवाड्याचे ज्येष्ठ कवी शम्स जालनवी यांची कविता
जिंदगी की हसीन राहोंमें
आंसुओं के चिराग जलते हैं
हाय ये कैसा दौरे हाजिर है
खून पी पी के लोग पलते हैं, या ओळी सादर केल्या.
आंतरराष्ट्रीय कवी राहत इंदौरीच्या बाबत नामवंत कवी डॉ. मेहताब आलम (भोपाल) यांनी,
सभी का खून शामील है यहॉं की मिठ्ठी में
किसी के बाप का हिंदुस्थां थोडे ही है, या शब्दात त्यांचे काव्य मांडले.
अशोक साहिल यांना श्रध्दांजली अर्पित करताना सोलापूरचे कवी नासिर आळंदकर यांनी सांगितले की,.
मेरी उर्दू को जिसने भी दहशतगर्द कहा होगा
उसे तो अपनी मां का दूध भी कडवा लगा होगा, या शब्दात काव्य सादर केले.
साहित्यिक मुजफ्फर हनफी यांच्याबद्दल रियाज वळसंगकर यांनी तर जेष्ठ साहित्यीक शम्सूर्रहमान फारूकी यांच्या बद्दल अभ्यासक डॉ. याहया नशीन यांनी माहिती दिली. अन्वर कमिशनर यांनी माजी आमदार युन्नूसभाई शेख, आयेशा जमादार यांनी इस्माईल जमादार, डॉ. अ. रशीद शेख यांनी कवी मुर्तुजा इमाम व जाहिदअली खान यांनी भोलूमियॉं सालार यांना आदरांजली वाहिली. फोरमचे अध्यक्ष विकारअहमद
शेख यांनी सर्वांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.