flight 
सोलापूर

नव्या वर्षात बोरामणी विमानतळ घेईल वेग ! जानेवारीत होणार थेट 29 हेक्‍टर भूसंपादन 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर : बोरामणी विमानतळाच्या उभारणीसाठी होत असलेल्या भूसंपादनाच्या अंतिम टप्प्यातील भूमी अधिग्रहणाचे काम नव्या वर्षाच्या सुरवातीला पूर्ण होत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एकूण 29 हेक्‍टर भूसंपादन थेट पद्धतीने खरेदीखताच्या आधारे केले जाणार आहे. त्यानंतर विमानतळाच्या बाबतीत पुढील विकासकामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

बोरामणी विमानतळासंदर्भात मागील काही वर्षांपासून भूसंपादनाचे काम सुरू आहे. त्यामध्ये शेवटच्या टप्प्यात ही प्रक्रिया नव्या नियमानुसार केली जाणार आहे. वर्ष 2014 मध्ये शासनाने भूसंपादनाच्या प्रक्रियेबाबत नव्याने आदेश काढले आहेत. त्यानुसार भूसंपादन न करता थेट शेतकऱ्यांच्या जमिनीचे खरेदीखत करून दिले जाणार आहे. तसेच मोबदल्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या प्रकियेत या वेळी एकूण 20 उतारे असलेल्या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा लाभ दिला जाणार आहे. बागायती, जिरायती या दोन प्रकारातील जमिनीनुसार भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

ठळक बाबी 

  • विमानतळाचे एकूण भूसंपादन : 550 हेक्‍टर 
  • शेवटच्या टप्प्यातील भूसंपादन : 29 हेक्‍टर 
  • संपादित जमिनीचे उतारे : 20 

प्रकल्प विकासाच्या टप्प्यात 
यानंतर राज्य विमानसेवा प्राधिकरणाकडून भूसंपादनाची प्रक्रिया संपली आहे. त्यामुळे आता प्राधिकरण हे विमानतळाच्या पुढील टप्प्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. प्राधिकरण याबाबत प्रस्ताव तयार करून शासनाकडे मागणी करणार आहे. या प्रकल्पातील सर्वात किचकट प्रक्रिया भूसंपादन असल्याने ती आता पूर्ण होत आहे. आता थेट विकासाच्या टप्प्यात हा प्रकल्प पोचला आहे. 

बोरामणी विमानतळासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 
- सज्जन निचळ, 
व्यवस्थापक, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT