large crowd gathers in mangalvedha to witness spectacle of Navratri festival 2023 Sakal
सोलापूर

Navratri Festival 2023 : नवरात्र महोत्सवात देखावे पाहण्यासाठी मंगळवेढ्यात मोठी गर्दी

नवरात्र महोत्सवात शहर 22 मंडळासह ग्रामीण भागातील एकूण 82 मंडळाकडून देवीच्या मूर्तीची स्थापना

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : शहर व ग्रामीण भागात यंदाच्या नवरात्र महोत्सवात नवरात्र मंडळांनी उभारलेल्या प्रबोधनाच्या,ऐतिहासिक, धार्मिक देखावे पाहण्यासाठी शहरात गर्दी वाढल्याने शहराला जत्रेचे स्वरूप आले.

नवरात्र महोत्सवात शहर 22 मंडळासह ग्रामीण भागातील एकूण 82 मंडळाकडून देवीच्या मूर्तीची स्थापना केली. या मंडळाकडून शहरात उभा केलेले देखावे विद्युत रोषणाई व इतर प्रबोधनाचे कार्यक्रम हे पाहण्यासारखे असल्याने देखावे व विद्युत रोषणाई रात्री उशिरापर्यंत सुरू असते.

मंगळवेढ्यासह शेजारच्या तालुक्यातील स्त्री व पुरुष मोठ्या प्रमाणात हे देखावे पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.या दरम्यान हॉटेल, पान दुकान ,किराणा दुकान, कापड दुकान यांची मोठे आर्थिक उलाढाल होत आहे.

शहरात फराळाचे साहित्य,खेळणी, फळे,साड्या,बनियन,याच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. सध्या तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक असल्यामुळे अनेकांनी बनियन व टी-शर्ट च्या रूपाने मदत झाली तर तालुक्यातील काही राजकीय नेत्याच्या नावाने देखील या मदतीत हातभार लागला.

सराफ गल्ली येथील नव महाराष्ट्र मंडळाने यंदा केदारनाथ मंदिराचा तर मारुती पटांगणातील जय भवानी मंडळाने देखील दर्शनीय देखावा उभा केला. इथल्या देवीच्या दर्शनासाठी मुख्य मंदिरापासून ते चोखामेळा चौकापर्यंत भाविकांची रांग लागली.

माने गल्ली येथे नऊ महाराष्ट्र तरुण मंडळाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा देखावा उभा केला. आहे तर काही ठिकाणी कारंजे लेजर सो दाखवले जात आहे, शनिवार पेठ,सनगर गल्ली,माने गल्ली,होनमाने गल्ली,माळी गल्ली, हे देखावे पाहण्यासाठी घरातून रात्री महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. त्यामुळे शहरांमध्ये नुसते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले.

यंदाच्या नवरात्र महोत्सवासाठी शहरात आलेल्या भाविकांची गर्दी लक्षात घेता 40 पुरुष व 15 महिला होमगार्डचा अतिरिक्त बंदोबस्त लावला असून महिलांनी दर्शनाला येताना आपापले दागिने सुरक्षित ठेवावेत.

- रणजीत माने पोलीस निरीक्षक मंगळवेढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT