lata mangeshkar passed away singing starts from Solapur  SAKAL
सोलापूर

आठवणीतील लतादीदी! गायनाची सुरवात सोलापुरातून

त्यांच्या गायनाची सुरवात सोलापुरातून झाली होती, अशी आठवण हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितली होती.

सकाळ डिजिटल टीम

त्यांच्या गायनाची सुरवात सोलापुरातून झाली होती, अशी आठवण हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितली होती.

सोलापुर : देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Legendary Singer Lata Mangeshkar) यांचे वार्धक्यानं निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे. लतादीदींच्या सोलापुरातील काही आठवणी आहेत. त्यांच्या गायनाची सुरवात सोलापुरातून झाली होती, अशी आठवण हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितली होती.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे गायन ऐकण्यासाठी आसुसलेल्या सोलापूरकरांनी हुतात्मा स्मृती मंदिरात प्रचंड गर्दी केली होती. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी बोलता बोलता "मी दीदीला फोन लावणार आहे आणि ती तुम्हा रसिकांशी संवाद साधणार आहे' असे सांगताच सोलापूरकरांनी प्राण कानात एकवटून शांतता पाळली. अन्‌ काही वेळातच कानी पडला भारतरत्न लता मंगेशकर यांचा तो स्वर्गीय स्वर. "सर्व सोलापूरकरांना माझा नमस्कार...'

आषाढी एकादशीनिमित्त हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम प्रस्तुत "जय हरी विठ्ठल' या कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मा स्मृती मंदिरात केले होते. यावेळी पंडित मंगेशकर यांनी मुंबईहून सोलापूरला येताना त्यांच्या भगिनी लता मंगेशकर यांच्याशी झालेला संवाद सांगितला. मी सोलापूरला जाणार आहे, असे म्हटल्यानंतर दीदीने मला सांगितले की, तू सोलापुरात गेल्यानंतर कार्यक्रम सुरू असताना फोन लावून दे, मला सोलापूरकर रसिकांशी बोलायचे आहे. त्यामुळे मी दीदीचा आणि तुम्हा रसिकांचा संवाद घडवून आणणार आहे, असे पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी कार्यक्रमाच्या सुरवातीलाच सांगितले होते.

कार्यक्रमाच्या मध्यंतरात त्यांनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांना फोन लावला होता, "हां मी बाळ बोलतोय. इथे रसिक सोलापूरकर जमले आहेत. तुला ऐकायला आतुर झाली आहेत', असे पंडितजी म्हणाले. यानंतर "सर्व सोलापूरकरांना माझा नमस्कार.' हे भारतरत्न लता मंगेशकर यांचे शब्द भ्रमणध्वनीच्या माध्यमातून कानी पडताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून लतादीदींना दाद दिली. त्या म्हणाल्या, "आषाढी एकादशीसारख्या चांगल्या दिवशी तुम्ही हृदयनाथचे गाणे ऐकायला एकत्र आला आहात याचा आनंद आहे. मला सोलापूरला येण्याची इच्छा आहे; परंतु योग येत नाहीये. तुम्हा सर्वांना मी प्रणाम करते. विठ्ठलाचे नाव घेते... जय हरी विठ्ठल...' हे संभाषण संपल्यानंतर पुन्हा टाळ्यांचा पाऊस सभागृहात पडला.

लतादीदींच्या गायनाची सुरवात सोलापुरातून

1942 मध्ये म्हणजे 73 वर्षांपूर्वी लतादीदींचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर भागवत चित्रमंदिर येथे कार्यक्रमासाठी आले होते. त्यांना गाताना ठसका लागल्याने त्यांनी गाणे थांबविले. तितक्‍यात मागून एक स्वर आला. आणि त्या स्वराने कार्यक्रम पूर्ण केला. तो स्वर होता भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा. त्यांचा स्वर हा जागतिक स्वर म्हणून ओळखला जातो. त्यांच्या गायनाची सुरवात सोलापुरातून झाली होती, अशी आठवण हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी सांगितली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

Mumbai Local: लोकल आता 'मेडिकल कवच'! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

SCROLL FOR NEXT