भारतरत्न लता मंगेशकर, जगद्विख्यात पार्श्वगायिका Sakal
सोलापूर

या अन्नछत्रात लतादीदींनी लाटल्या पोळ्या अन् भेट दिल्या अलिशान गाड्या

लतादीदी आणि अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या कुटुंबाचे ऋणानुबंध अनेक वर्षांपासून आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गानसम्राज्ञी लता मंगेशकर लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज निधन झाले. लतादीदी आणि अक्कलकोट (Akkalkot) येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या कुटुंबाचे ऋणानुबंध अनेक वर्षांपासून आहेत. यातूनच लतादीदींनी त्यांच्या दोन आलिशान गाड्या (Luxury Car) जन्मेजयराजे भोसले यांना भेट दिल्या आहेत.

लता मंगेशकर यांच्या मर्सिडीज्‌ बेंझ-कॉम्प्रेसर सी 200 (एमएच 01 एनए 4221) व शेव्हरलेट-क्रुझ (एमएच 01 एएक्‍स 8584) अशा दोन आलिशान गाड्यांच्या किल्ल्या आणि कागदपत्रे भोसले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. हा कार्यक्रम मंगेशकर यांच्या "प्रभुकुंज' या निवासस्थानी पार पडला. यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर, उषाताई मंगेशकर, मीनाताई खडीकर आदी मंगेशकर परिवार आणि जन्मेजयराजे भोसले यांचे कुटुंबीय उपस्थित होते. मीनाताई खडीकरलिखित "मोठी तिची सावली' या पुस्तकात जन्मेजयराजे भोसले यांचा उल्लेख घरातील माणसे असे करण्यात आला आहे.

लतादीदींनी लाटल्या पोळ्या-

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे अक्कलकोटमधील शिवस्मारक, कारंजा, खुली व बंदिस्त व्यायामशाळा, प्रशस्त वाहनतळ, शिवचरित्र प्रदर्शन हॉल, यात्री निवास, यात्रीभुवन अशा अनेक प्रकल्पांच्या निर्मितीबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहे. लता मंगेशकर यांनी अन्नछात्र मंडळातील अन्नपूर्णा गृहात स्वत: पोळ्या लाटून सेवा बजावली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक गुरुपौर्णिमेला हृदयनाथ मंगेशकर व उषा मंगेशकर यादेखील सांस्कृतिक सेवा बजावित आहेत.

लता मंगेशकर यांचा आशीर्वाद व शुभेच्छा कायमच आमच्या कुटुंबावर आहे. त्यांनी मला त्यांच्या दोन मोटारी भेट दिल्या आहेत. त्या भोसले कुटुंबीयांना आमच्या दैवतांचा रथ असल्यासारख्या वाटतात.

- जन्मेजयराजे भोसले,

संस्थापक अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांच्या कार्याला मंगेशकर परिवाराचा कायम आशीर्वाद व मार्गदर्शन आहे.

डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय संचालक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT