सत्ता आली तरच सर्वांचे अस्तित्व : बळिराम साठे
सत्ता आली तरच सर्वांचे अस्तित्व : बळिराम साठे 
सोलापूर

सत्ता आली तरच सर्वांचे अस्तित्व : बळिराम साठे

दयानंद कुंभार

मतभेद विसरून पक्ष बळकट करण्यासाठी प्रत्येकाने काम करावे, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी दिला.

वडाळा (सोलापूर) : गेल्या 50 वर्षांपासून मी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निष्ठा ठेवून कार्य करीत आहे. स्वतःसाठी मी कधीच त्यांच्याकडे पद मागितले नाही. राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात (Solapur District) पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात कशा येतील, यासाठी आतापासूनच सर्वांनी कामाला लागले तरच आपले सर्वांचे पक्षातील अस्तित्व टिकून राहील. मतभेद विसरून पक्ष बळकट करण्यासाठी प्रत्येकाने काम करावे, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे (District President of NCP Baliram Sathe) यांनी दिला. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्हा आढावा बैठक नुकतीच वडाळा येथे झाली. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

या वेळी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार राजन पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, जिल्हा सरचिटणीस संजय पवार, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र हजारे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, गोवर्धन चवरे, लतीफ तांबोळी, राष्ट्रवादी कॉंग्रेस उद्योग व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, युवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे, ज्योत्स्ना पाटील, सुवर्णा झाडे, वडाळा गावचे सरपंच व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद, दक्षिणचे तालुका अध्यक्ष बिपिन करजोळे, दिलीप सिद्धे, प्रकाश चवरे, विजयसिंह देशमुख, भारत बेदगे, मनोज साठे, चंद्रकांत शिंदे, राजकुमार पौळ, संदीप मांडवे, मानाजी माने, रमेश पाटील, महेश माने, मारुती जाधव यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपसातील मतभेद बाजूला सारून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बळकट कसा होईल, यासाठी प्रत्येकाने काम करावे, असा सल्ला आमदार बबनराव शिंदे यांनी या वेळी दिला.

परस्पर नेमणुकाचा अधिकार कोणी दिला? : उमेश पाटील

या वेळी जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील म्हणाले, की एकेकाळी सोलापूर जिल्हा भक्कम बालेकिल्ला होता. आज आपला एकही खासदार नाही. सात आमदार निवडून येण्याची क्षमता असतानाही प्रत्यक्षात मात्र उलट स्थिती आहे. अनेक कमिट्यांवर परस्पर नेमणुकीचा अधिकार कुणी दिला? गाडीचा दरवाजा उघडणाऱ्यांना हा अधिकार नाही, असे ठणकावून सांगितले. या वेळी जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यात राष्ट्रवादी कशी कमकुवत आहे हे आपल्या भाषणातून दाखवून देत कार्यकत्यांना तिथे बळ देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

भाषण करणे सोपे : राजन पाटील

या वेळी राजन पाटील म्हणाले की, भाषण करणे सोपे असते, पण लोकांचे संसार उभे करणे अवघड असते. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात पक्षाची स्थिती विदारक आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता वैफल्यग्रस्त झाला आहे. यासाठी या बैठकीत चिंतन होणे आवश्‍यक आहे. जनता सुप्त अवस्थेत असते. संधी येताच मतदानातून व्यक्त होत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT