Kokate sir melava.jpeg 
सोलापूर

विधानपरिषद म्हणजे पुनर्वसन केंद्र नव्हे : प्रविण गायकवाड 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : देशातील सहा राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे. विधानसभेतून विद्वत्ताना प्रतिनिधित्व मिळेलच असे नाही. राज्याच्या विविध क्षेत्रातील जाणकारांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग असावा, त्यांच्या व्यासंगाचा राज्यकारभारात उपयोग व्हावा, यासाठी विधानपरिषदेची निर्मिती झाली आहे. ते पुनर्वसन केंद्र नसून विद्धतांची सभा आहे असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले. पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ज्येष्ठ विचारवंत डॉ श्रीमंत कोकाटे यांच्या प्रचारार्थ डॉ. निर्मलकुमार फडकूले सभागृहात पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

या मतदार प्रक्रियेत पक्ष आणि त्यांच निवडणूक चिन्ह याचा कोठे ही उल्लेख आढळत नाही. म्हणजेच राजकारण विरहित प्रतिनिधी असावेत, असा संकेत आहे. पण आज मात्र हा ज्येष्ठांचे सभागृह, राजकीय कार्यकर्त्यांचे पुनर्वसन केंद्र झाले आहे. संविधानाला अभिप्रेत असा प्रतिनिधी म्हणून डॉ श्रीमंत कोकाटे हेच एकमेव उमेदवार आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

उमेदवार डॉ श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या भाषणात बेरोजगार पदवीधरांपासून ते डॉक्‍टर, विधिज्ञ, व्यवसायिक, नोकरदार, शेतकरी, गृहिणी अशा विविध क्षेत्रातील पदवीधरांच्या समस्या या वेगवेगळ्या आहेत. त्यांच्या समस्यांवर उपाय काढण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे. ज्येष्ठांचा सभागृहाच महत्त्व वाढवून त्याची प्रतिष्ठा वाढवण्याच काम करणार आहे. आपल्या पुढच्या पिढीच भविष्य बळकट करण्यासाठी माझी उमेदवारी आहे, असं मत व्यक्त केले. 

यावेळी व्यासपीठावर युवा उद्योजक गणेश माने देशमुख संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष अमरजीत पाटील, डॉ. रावसाहेब पाटील, डी. एन. गायकवाड, इरफान सय्यद, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले उपस्थित होते. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या मेळाव्याचे संयोजन संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्‍याम कदम यांनी केले होते. 

यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद व जुनी पेन्शन हक्क समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे लखन थिटे, सीताराम बाबर, अरविंद शेळके, नागेश पवार, संजय भोसले, सुलेमान पिरजादे, पिंटू पांढरे, विनोद आगलावे, हनुमंत पवार, दत्ता पवार, धर्मा भोसले, बसवराज आळगे, अजित शेटे, सत्यम सूर्यवंशी, जुनी पेन्शन संघटनेचे आशिष चव्हाण, राम शिंदे, प्रमोद कुपेकर, पद्मसिंह व्हरडे, सरदार नदाफ, श्री. लंबे सर आदींसह अनेक पदवीधर मतदार यावेळी उपस्थित होते. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT