Leopard animal attacks Jharg and Mane Konheri solapur forest department
Leopard animal attacks Jharg and Mane Konheri solapur forest department sakal
सोलापूर

Solapur News : कोन्हेरी येथील जरग व माने वस्तीवर बिबट्या सदृश्य प्राण्याचा धुमाकूळ"बोकडावर हल्ला

राजकुमार शहा

मोहोळ : कोन्हेरी ता मोहोळ येथील जरग व माने वस्ती परिसरात शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने परिसरात मोठी घबराट पसरली आहे. त्याने वस्तीवरील एका बोकडावर हल्ला केला, मात्र वस्तीवरील नागरिकांनी आरडाओरड केल्याने त्याने पळ काढला.

शुक्रवार ता 24 रोजी सायंकाळी नेहमी प्रमाणे विठ्ठल सिताराम लवटे हे शेतातुन जनावरे व शेळ्या घेऊन वस्तीवर आले. सायंकाळच्या सुमारास घरातील एका महिला सदस्याने शेळ्या, बोकड घरात कोंडत असताना अचानक बिबट्या सदृश्य प्राणी त्या ठिकाणी आला व त्याने बोकडावर हल्ला केला. बोकडाच्या गळ्याला दात लागला आहे. वस्तीवरील नागरिक जमा झाल्याने सदर प्राण्याने पळ काढला. अनेकांचा तो लाडगा आहे असा गैरसमज झाला.

दरम्यान ही माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, सामाजिक कार्यकर्ते सज्जन चवरे यांनी जरग वस्तीवर येऊन माहिती घेतली व नागरिकांना दिलासा दिला. त्यांनी वनविभागाचे अधिकारी सतीश उडगी, नागनाथ गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांना फोन करून माहिती दिली.

उडगी व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळ गाठले व वस्तीजवळच कॅमेरा लावला. तसेच नागरिकांना सूचना दिल्या. या संदर्भात उडगी म्हणाले, शेतकऱ्यांनी गर्दी करू नये, सदरचा प्राणी हा करमाळा, टेंभुर्णी मार्गे पाटकुल परिसरात आला असल्याची शक्यता असून, गर्दी दिसल्यावर तो माणसावर हल्ला करण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT