SHARP SHOOTER 
सोलापूर

शार्प शूटरचा हुकला तीनवेळा नेम ! हातावर तुरी देऊन बिबट्या पुन्हा निसटला

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा मुक्काम सध्या वांगी परिसरात असून, नरभक्षक बिबट्याला मारण्यासाठी वन विभागाने फायरिंग करूनही शुक्रवारी बिटरगाव (वा) येथून पुन्हा वनविभागाच्या हातावर तुरी देऊन बिबट्या निसटला आहे. वन विभागाने शार्पशूटर पाचारण करूनही बिबट्या एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीनदा सुटतोच कसा, असा प्रश्न संपूर्ण तालुक्‍याला पडला आहे. 

वन विभागाला नरभक्षक बिबट्यास गोळ्या घालण्याचे आदेश मिळूनही बिबट्याला शार्पशूटरचा नेम का लागत नाही? याविषयी आता उलट-सुलट चर्चा सुरू आहे. गुरुवारी (ता. 10) सांगवी नं. 2 येथे मनीषा पाटील या महिलेवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यातून त्या बचावल्या. या भागात 200 वन विभागाचे कर्मचारी तैनात असताना गेल्या 10 दिवसांपासून वन विभागाला बिबट्या जेरबंद करता आला नाही. 

बिबट्याचा प्रवास सांगवी - नरसोबाचीवाडी ते वांगी नंबर 4 असा झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री दोन वाजता परप्रांतीय मच्छिमारांना बिबट्या दिसला होता. परंतु त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. पण शुक्रवारी (ता. 11) पाच वाजेपर्यंत वनविभागाची यंत्रणा वांगी नं. चारवरून बिबट्याचा माग काढत चार वाजेपर्यंत बिटरगाव शिवारात पोचली. बिटरगाव येथील विठ्ठल रोडगे यांच्या शेतात वनविभागाच्या शूटरने त्याच्यावर तीन वेळा फायरिंग केली, परंतु त्याला चकवा देऊन निसटण्यात बिबट्याला पुन्हा यश आले. तो बोरकर व नलवडे यांच्या शेतातून उसाच्या फडात जाण्यात यशस्वी झाला. 

वन विभागाची यंत्रणा ड्रोन, वाघर यांच्या मदतीने त्याचा शोध घेत आहे. सध्या तरी वनविभागाच्या तावडीतून सुटण्यात बिबट्या यशस्वी झाला आहे. बिबट्याचा प्रवास आतापर्यंत उजनी धरणाच्या पाण्याच्या जवळपर्यंत झाला असून आता पुढे जाणे शक्‍य नसल्याने पुन्हा वांगीच्या दिशेने बिबट्या माघरी येण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

बिटरगाव येथे वनविभागाने बिबट्यावर फायरिंग केली, मात्र बिबट्या निसटला. खरंच वनविभागाला बिबट्या मारायचा आहे का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बिबट्या समोर दिसूनही गोळ्या का घातल्या जात नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. अजून किती लोकांचे जीव घेण्याचा हे वाट बघत आहेत. 
- महेंद्र पाटील, 
ग्रामस्थ, बिटरगाव वा. (ता. करमाळा) 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT