Dhavalsinh 
सोलापूर

धवलसिंह मोहिते-पाटलांनी उडवले 20 ते 25 फुटांवरून बिबट्याचे मस्तक ! 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात धुमाकूळ घातलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यास वन विभागाला यश आले आहे. शार्प शूटर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते- पाटील यांनी बिबट्याच्या मस्तकावर गोळी घातली आहे. 

धनलसिंह मोहिते- पाटील हे गेल्या चार दिवसांपासून या बिबट्याच्या मागावर होते. शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी सहा वाजता या नरभक्षक बिबट्यास गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. वांगी नंबर चार येथील राखोंडे वस्तीवरील पांडुरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत या बिबट्याला 20 ते 25 फुटांवरून गोळ्या घालण्यात आल्या आहेत. या वेळी त्यांच्याबरोबर बिटरगावचे महेंद्र पाटील, नागनाथ मंगवडे उपस्थित होते. 

या बिबट्याने करमाळा तालुक्‍यात मोठी दहशत घातली होती. तालुक्‍यातील तीन जणांचे बळी या बिबट्याने घेतले होते. 3 डिसेंबर रोजी फुंदेवाडी येथील कल्याण देविदास फुंदे, 5 डिसेंबर रोजी अंजनडोह येथील जयश्री दयानंद शिंदे, 7 डिसेंबर रोजी चिखलठाण येथील फुलाबाई अरचंद कोटली ही ऊस तोडणी कामगाराची आठ वर्षांची मुलगी यांच्यावर नरभक्षक बिबट्याने हल्ला करून तिघांचाही बळी घेतला होता. तसेच बिबट्याने शेतकऱ्यांच्या अनेक गाई, म्हशी, शेळी, बैल, कुत्रा आदी पाळीव प्राण्यांवरही हल्ले करून ठार केले होते. त्यामुळे करमाळा तालुक्‍यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या नरभक्षक बिबट्यास मारण्यासाठी शार्पशूटर बोलाण्यात आले होते. 

बिबट्याला ठार मारण्यात आलेल्या शार्पशूटरच्या पथकामध्ये धवलसिंह मोहिते-पाटील यांचा समावेश होता. बिबट्याच्या पोस्टमार्टेमसाठी सोलापूर येथे नेण्यात येणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तमिळनाडूत मोठा ट्विस्ट! थलापती विजय मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार; काँग्रेसने डीएमकेसोबतची युती तोडली, एका अटीवर टीव्हीकेला पाठिंबा

Tamil Nadu Politics : दिल्लीची पुनरावृत्ती की नवी खेळी? 'थलपती'च्या TVK ला पाठिंबा देताना काँग्रेस पुन्हा तीच मोठी चूक करतेय? पक्षासाठी ठरणार धोक्याची घंटा?

Pakistan News: आर्थिक संकटात पाकिस्तानचा मोठा यू-टर्न! इस्लामच्या नावाखाली 50 वर्षांपूर्वी बंद केलेली ‘ही’ गोष्ट पुन्हा सुरू

Jammu Kashmir Prepaid SIM Rules : जम्मू-काश्मीरमध्ये आपलं प्रीपेड सिमकार्ड का चालत नाही? 99% लोकांना माहिती नाही, 'हे' आहे कारण

IPL 2026 फायनल अहमदाबादला! बंगळुरूने मान गमावला, play off चं वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT