leopards again the fear in mohol taluka
leopards again the fear in mohol taluka 
सोलापूर

बिबट्यासदृश प्राण्याचा मोहोळ तालुक्‍यात पुन्हा धुमाकूळ

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ (जि. सोलापूर) : पाटकूल (ता. मोहोळ) येथे बिबट्यासदृश प्राण्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून दहशत निर्माण केली आहे. रविवारी रात्री त्या प्राण्याने पुन्हा एकदा हल्ला करून एक बोकड पळविले असून यात एक गायही जखमी झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे. दरम्यान, वनविभागाच्या पथकाने आज त्या ठिकाणी ठसे शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ठसे आढळून आले. 

बिबट्यासदृश प्राण्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाटकूल परिसरात धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी ब्रह्मदेव सातपुते या शेतकऱ्याचे बोकड पळवले होते. सोमवारी रात्री तीच पुनरावृत्ती झाली. पाटकूल शिवारातील सातपुते वस्ती व कुरण वस्ती परिसरातच बिबट्यासदृश प्राण्याचा वावर आहे. दरम्यान, काल रात्रीच्या हल्ल्याची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाच्या पथकाने त्या ठिकाणी प्राण्याचे ठसे शोधले असता त्यांना ठसे आढळून आले आहेत. करमाळा येथून पिंजरे मागविले असून आज रात्री वस्ती परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार यांनी दिली. 
सध्या उजनी कालव्याला पाणी सुटले आहे. त्यामुळे शेतकरी रात्री-अपरात्री पिकाला पाणी देत आहेत. मात्र या प्राण्याच्या भीतीने मोठी अडचण निर्माण झाली आहे. पाणी नाही द्यावे तर ऊस जळतोय, द्यावे तर भीती वाटते अशी द्विधा मनःस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. 

भीतीचे वातावरण 
आमच्या वस्तीवर वन विभागाच्या अधिकाऱ्याचे पथक तसेच सरपंच येऊन गेले असून त्यांनी पाहणी केली आहे. माझ्या मालकीचे बोकड रात्री त्या प्राण्याने दाव्याला हिसका देऊन पळवून नेले आहे. यामुळे भीतीचे वातावरण आहे. जनावरे घराबाहेर बांधावी तर नुकसानीचे ठरत आहे. 
- लक्ष्मण अवताडे, शेतकरी, पाटकूल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT