... अन्यथा 'सिद्धेश्‍वर'च्या चिमणी पाडकामाला मिळू शकते दोन महिन्यांची मुदत! Sakal
सोलापूर

महापालिकेचे मक्तेदाराला पत्र! मुदत देऊनही कारखाना शांतच, चिमणी पाडकामाच्या तयारीचे मक्तेदाराला आदेश

चिमणी पाडण्यासाठी महापालिकेने कारखाना प्रशासनाला ४५ दिवसांची मुदत दिली. ११ जूनला मुदत संपणार असून ३२ दिवसांत कारखान्याने कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मक्तेदाराला चिमणी पाडकामाची तयारी सुरु करावी, असे पत्र पाठवले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची अवैध चिमणी स्वत:हून पाडण्यासाठी महापालिकेने कारखाना प्रशासनाला ४५ दिवसांची मुदत दिली आहे. ११ जून रोजी ही मुदत संपुष्टात येणार असून मागील ३२ दिवसांत कारखान्याने त्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेने हैदराबादच्या मक्तेदाराला चिमणी पाडकामाची तयारी सुरु करावी, असे पत्र पाठवले आहे.

केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत सोलापूरचा समावेश पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात देखील आहे. परंतु, जून २०१६ पासून अजूनही या योजनेअंतर्गत एकही विमान सोलापूर विमानतळावरून उडू शकलेले नाही. होटगी रोड विमानतळ परिसरातील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को-जनरेशनची चिमणी विमानसेवेला प्रमुख अडथळा असल्याचे अनेकदा महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

पण, शेतकऱ्यांच्या पैसातून उभारलेली चिमणी बचावासाठी कारखान्याने अनेक वर्षे न्यायालयीन लढा लढला. आता महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कारखान्याला पत्र काढत ४५ दिवसांची मुदत दिली आहे. ११ जूनला ही मुदत संपुष्टात येणार आहे, त्या काळात कारखान्याने स्वत:हून चिमणी काढून न घेतल्यास महापालिका मक्तेदाराच्या माध्यमातून चिमणी हटवणार आहे. त्याअनुषंगाने आता महापालिकेने चिमणी पाडकामाच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे.

ठळक बाबी...

  • - दिनायस कॉन्ट्रक्ट प्रा. लि. या हैदराबाद येथील कंपनीला १.१७ कोटीला चिमणी पाडकामाचे टेंडर

  • - कारखान्याला चिमणी पाडकासाठी दिलेली मुदत ११ जूनला संपणार असून १० जूनपर्यंत आपण यंत्रणा तयार ठेवावी

  • - ११ जूनला मुदत संपल्यानंतर कारखान्याची चिमणी पाडकामाची प्रक्रिया मक्तेदाराने सुरु करावी

  • - आवश्यकता भासल्यास कारखाना परिसरात तैनात केला जाणार पोलिसांचा मोठा बंदोबस्त

चिमणी पाडून आर्थिक गुलामगिरीतुन सुटका करा
श्री सिध्देश्वर साखर कारखान्याच्या को-जनरेशनची अनधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामाविषयी कारखाना प्रशासन इच्छुक नाही. नेहमीप्रमाणे कारखान्यातील कामगार, लहान मुले, महिला, वृद्धांना पुढे करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची पुनवृत्ती होण्याची शक्यता सोलापूर विकास मंचने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनने केंद्राकडून पाच हजार सशस्त्र निमलष्करी दलाचा फौजफाटा तैनात ठेऊन सोलापूरच्या विकासात प्रमुख अडथळा असलेली चिमणी पाडावी आणि सोलापूरकरांची आर्थिक गुलामगिरीतुन सुटका करावी, अशी मागणी सोलापूर विकास मंचने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे यांच्याकडे केली आहे. यावेळी विकास मंचचे सदस्य केतन शहा, गणेश पेनगोंडा, गणेश शिलेदार, विजय जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT