पोलिस भरतीसाठी हमीपत्राचे बंधन Sakal
सोलापूर

Solapur : पोलिस भरतीसाठी हमीपत्राचे बंधन; सोलापूरच्या उमेदवारांसाठी गुरुवारपर्यंत मुदत; शहर पोलिसांकडून सूचना नाहीत

सोलापूर ग्रामीणमध्ये चालकांच्या नऊ तर पोलिस शिपायाच्या ८५ जागांची भरती होत आहे. त्यासाठी ४५८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पोलिस भरतीतून या टप्प्यात राज्यातील १७ हजार ४७१ पदांसाठी तब्बल १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. उमेदवारी अर्जांचा विचार करता पोलिस भरतीसाठी किमान सहा महिने लागतील एवढे अर्ज आहेत. त्यामुळे एकाच उमेदवाराने एकापेक्षा अधिक जिल्ह्यात वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला असल्यास त्यांना आता एकाच जिल्ह्याची निवड करावी लागणार आहे. त्यासाठी हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सोलापूर ग्रामीणमध्ये चालकांच्या नऊ तर पोलिस शिपायाच्या ८५ जागांची भरती होत आहे. त्यासाठी ४५८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सोलापूर शहर व ग्रामीण पोलिस खात्यातील जवळपास २०० पदांची भरती यावेळी होणार आहे.

त्यासाठी दोन हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरूणांनी वेगवेगळ्या शहर- जिल्ह्यात भरतीसाठी अर्ज केले आहेत. उमेदवारांच्या सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी हमीपत्र देण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या अलंकार हॉलमध्ये उपस्थित राहायचे आहे.

उद्या (बुधवारी) व गुरुवारपर्यंत हमीपत्र देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. हमीपत्र भरून घेतल्यानंतर त्याचा अहवाल अप्पर पोलिस महासंचालकांना (प्रशिक्षण व खास पथके) पाठविला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलिस भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे.

ग्रामीण पोलिसांच्या उमेदवारांना सूचना

पोलिस भरती २०२२-२३ साठी सोलापूर जिल्ह्यात राहणाऱ्या ज्या उमेदवारांनी एकाच पदासाठी एका एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज केले आहेत. अशा उमेदवारांनी पोलिस भरतीसाठी एकाच जिल्ह्याची निवड करून तसे हमीपत्र प्रत्यक्ष हजर राहून द्यायचे आहे.

या पार्श्वभूमीवर अप्पर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) यांच्या कार्यालयाकडून किंवा सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून ज्या उमेदवारांना मेसेज पाठविले आहेत किंवा मेसेज आले नाहीत पण अर्ज केला आहे,

अशा सर्व उमेदवारांनी १५ व १६ मे रोजी सोलापूर शहरातील ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये सकाळी दहा वाजता उपस्थित राहायचे आहे. येताना उमेदवारांनी आधारकार्ड व त्याची छायांकित प्रत व भरलेल्या अर्जाची प्रत आणायची आहे.

जिल्ह्यातील पोलिस भरतीची स्थिती

(शहर पोलिस)

  • पोलिस शिपाई - ३४

  • चालक शिपाई - १६

  • उमेदवारांचे अंदाजे अर्ज - १६००

(ग्रामीण पोलिस)

  • चालक शिपाई - ९

  • पोलिस शिपाई - ८५

  • उमेदवारांचे अर्ज - ४५८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT