Shri Vitthal 
सोलापूर

श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचे ऍपद्वारे लाइव्ह दर्शन 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी सध्या बंद असले तरी मंदिरे समितीच्या www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर तसेच खासगी कंपनीच्या सेवेद्वारे श्रींचे लाइव्ह दर्शन 24 तास उपलब्ध आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. 
श्री. जोशी म्हणाले, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असल्याने राज्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर 17 मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. 30 जूनपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. तथापि "श्रीं'चे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू आहेत. 
श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर तसेच खासगी कंपनीच्या सेवेद्वारे डिशवर श्री लाइव्ह दर्शन 24 तास उपलब्ध आहे. तसेच "श्री विठ्ठल-रुक्‍मिणी देवस्थान' या मोबाईल ऍप्लिकेशनवर देखील दर्शन उपलब्ध आहे. हे मोबाईल ऍप गुगल ऍप स्टोअरवर "श्री विठ्ठल-रुक्‍मिणी देवस्थान' या नावाने मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भाविकांना जरी श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद असले तरी वरील संकेतस्थळावरून तसेच डिश आणि मोबाईल ऍपद्वारे घरबसल्या "श्रीं'च्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Isro News : चंद्र अन् अंतराळात भारताची छाप! अंतरिक्ष स्टेशनचे स्वप्न आले जवळ; इस्रोची दोन नवीन स्पेडेक्स मोहिमा जाहीर

बिग बॉसच्या घरात तुला भाऊ मानणारे लग्नाला का नाही आले? सुरज चव्हाणने मारली पलटी; म्हणतो- आता ते लोक...

World Tuberculosis Day 2026: पाठदुखी फक्त पोस्चरमुळे नाही; कधी स्पायनल टीबीही असू शकतो कारण ! 'ही' लक्षणं दुर्लक्षित करू नका

Who is Ashok Kharat : कॅप्टन खरातकडून पंचवीस वर्षांपासून अंधश्रद्धेला खतपाणी! 'सकाळ'ने वृत्तमालिकेद्वारे भोंदूगिरीवर टाकला होता प्रकाशझोत

IPL 2026 New Rule : १५ नवीन नियम... BCCIने खेळाडू, त्यांचे कुटुंबिय अन् फ्रँचायझीची डोकेदुखी वाढवली; चुका केल्यास कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT