सोलापूर

#Lockdown : हौशी कार्यकर्त्यांकडून शोबाजी; पोलिसांकडून कारवाई 

परशुराम कोकणे

सोलापूर : संचारबंदीच्या काळात गरिबांना मदत करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून पास घेऊन काही मंडळी शोबाजी करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशा हौशी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाईला सुरवात केली आहे. त्यामुळे आता सोशल डिस्टन्सिंग न पाळता सामाजिक उपक्रम राबविणे महागात पडणार आहे. 

संचारबंदी, लॉकडाउनच्या काळात निराधार, गरिबांना अडचणी येत आहेत. त्यांना अन्न-पाणी देण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, संघटना पुढे येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण ज्या कारणासाठी संचारबंदी लागू करण्यात आली तो हेतूच काही मंडळी विसरत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येकात किमान तीन फुटांचे अंतर ठेवणे आवश्‍यक आहे. मात्र, काहीजण सोशल डिस्टन्सिंग न पाळता सामाजिक उपक्रम राबवत आहेत. हा प्रकार म्हणजे कोरोनाचा प्रसार केल्यासारखेच आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

अनेकजण संचारबंदीच्या काळात निराधारांना अन्न-पाणी वाटप करतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यात कोठेही सोशल डिस्टन्सिंग पाळला जात नसल्याचे दिसत आहे. यामुळे नाकाबंदी आणि गस्तीवर असलेल्या पोलिसांना अडचणी येत आहेत. 

कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून संचारबंदी लागू केली आहे. या काळात गरिबांना मदत करण्यासाठी म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांना नियम व अटी घालून पास दिले आहेत. सर्वांनी त्या नियमांचे पालन करायला हवे. सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचा आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. 
- अभय डोंगरे, 
सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा 

गरिबांना खरंच मदत करण्यासाठी जायचे असेल तरच आणि पोलिसांची परवानगी घेऊनच सामाजिक कार्यकर्त्यांनी बाहेर पडावे. सोलापुरात अनेक ठिकाणी शोबाजी दिसून येत आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. हौशी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई करायला हवी. 
- ऍड. उमेश भोजने,
सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT