CM_Farmer 
सोलापूर

मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांच्या जीवावर ! सगळ्याच मालाचे भाव पडल्याने आर्थिक संकट; व्यापारी होताहेत मालामाल

संतोष सिरसट

उत्तर सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात केलेली लॉकडाउनची घोषणा शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. मुख्यमंत्र्यांनी ती घोषणा केल्यापासून बाजारात शेतमालाचे भाव ढासळले आहेत. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचा गैरफायदा घेत व्यापारी हे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचे चित्र सोलापूर जिल्ह्यात दिसून येत आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य केले. त्या वक्तव्याने राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा घात केला आहे. मुख्यमंत्र्यांची ती घोषणाच शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरली आहे. ठाकरे यांच्या घोषणेचा गैरफायदा व्यापाऱ्यांनी घेण्यास सुरवात केली आहे. घोषणेपूर्वी शेतमालाला चांगला बाजारभाव होता. मात्र, ठाकरे यांच्या घोषणेचा प्रचंड फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आणि त्याचा जोरदार फायदा राज्यातील व्यापाऱ्यांनी घेण्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे सर्वच शेतमालांचे भाव मोठ्या प्रमाणात पडले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्याचा शेतकऱ्यांमधून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे. 

कोरोना संकटामुळे मुख्यमंत्र्यांनी जरी ती घोषणा केली असली तरी त्याबाबत योग्य ते स्पष्टीकरण करणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, ही जरी वस्तुस्थिती असली तरी मुख्यमंत्र्यांनी घाईगडबडीत केलेली लॉकडाउनची घोषणा शेतकऱ्यांचा घात करत आहे. त्यामुळे खरोखरच मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा करणं अपेक्षित होतं का, असाही सवाल आता शेतकऱ्यांमधून विचारला जाऊ लागला आहे. 

लॉकडाउन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा शेतकऱ्यांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी योग्य ते स्पष्टीकरण देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. 

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनच्या संदर्भात केलेल्या घोषणेपूर्वी माझ्या द्राक्ष बागेचा सौदा झाला होता. मात्र घोषणेनंतर व्यापारी आता माझा माल घेऊन जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचा मोठा आर्थिक फटका मला बसला आहे. 
- दयानंद पाटील, 
द्राक्ष उत्पादक शेतकरी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : राज्यासह देशभरातील विविध ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT