3solapur_news_mahanagarpalika_696x364_1.jpg 
सोलापूर

पार्क स्टेडिअमजवळील 59 गाळ्यांना लावले कुलूप ! रेडिरेकनर दराप्रमाणे भाडे भरण्यावरुन कारवाई 

तात्या लांडगे

सोलापूर : पार्क स्टेडिअमजवळील 59 गाळेधारकांकडे महापालिकेची तीन कोटी 55 लाखांची थकबाकी आहे. मुदत संपल्यानंतरही त्यांनी भाडे दिलेले नाही. त्यामुळे आज महापालिकेचे उपायुक्‍त जमीर लेंगरेकर यांच्या नेतृत्वाखाली त्या गाळ्यांना कुलूप ठोकण्यात आले.

उपायुक्‍त लेंगरेकर म्हणाले... 

  • महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, शहरातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी गाळेधारकांना सुधारित भाडे भरावेच लागेल 
  • पार्क स्टेडिअमलगतच्या 59 गाळ्यांची संपली मुदत; तीन कोटी 55 लाखांची थकबाकी भरलीच नाही 
  • जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त व मुंद्रांक शुल्क जिल्हाधिकाऱ्यांनी निश्‍चित केलेले सुधारित भाडे गाळेधारकांनी भरण्याची तयारी दर्शवावी 
  • गाळेधारकांनी सुधारित भाडे भरण्याच्या अनुषंगाने महापालिकेला विनाअट लेखी द्यावे 
  • गाळ्यांची मालकी क्रिडा समितीची नव्हे तर महापालिकेचीच; भाडे भरल्याशिवाय कारवाई मागे अशक्‍यच 

पार्क स्टेडिअमलगतच्या गाळ्यांची मालकी क्रिडा समितीकडे आहे. त्यात महापालिकेला भाडे ठरविण्याचा अधिकार नसल्याचे सांगत काही गाळेधारकांनी न्यायालयाचे दार ठोठावले. तत्पूर्वी, त्यांनी मागील भाडेही भरले नाही आणि पुन्हा न्यायालयात धाव घेतली. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्या आदेशानुसार संबंधित गाळ्यांना कुलूप लावण्याची कारवाई करण्यात आली. गाळेधारकांना अगोदरच नोटीस बजावल्याने बहुतेक गाळे आज बंदच होते. महापालिकेने या गाळ्यांवर कारवाई करण्यासाठी कर संकलन विभागासह अन्य विभागांच्या कर्मचाऱ्यांना नियुक्‍त केले होते. आता संबंधित गाळेधारकांनी न्यायालयातील याचिका मागे घेऊन त्रिस्तरीय समितीने ठरवून दिलेले भाडे भरण्यास तयार असल्याचे विनाअट लेखी द्यावे. अन्यथा कारवाई थांबवली जाणार नाही, अशी भूमिका महापालिकेने घेतल्याची चर्चा आहे. प्रसंगी या गाळ्यांचा पुन्हा लिलाव करू असा इशाराही प्रशासनाने दिल्याचे बोलले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गाळेधारक विरुध्द महापालिका आयुक्‍त (प्रशासन) असा वाद रंगणार अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Rare Otters in Sangli : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! कृष्णा नदीपात्रात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ पाणमांजरांचा कळप; 8 ते 9 पाणमांजरं दिसली एकत्र

SCROLL FOR NEXT