Prakash Ambedkar sakal
सोलापूर

Prakash Ambedkar : काँग्रेसचा उमेदवार निवडून येताच भाजपत जातील

प्रतिज्ञापत्रात देशातील व विदेशात संपत्तीची माहिती न दिल्याने येथील काँग्रेसच्या उमेदवाराची निवडून येताच चौकशी सुरू होईल.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - प्रतिज्ञापत्रात देशातील व विदेशात संपत्तीची माहिती न दिल्याने येथील काँग्रेसच्या उमेदवाराची निवडून येताच चौकशी सुरू होईल. त्यावेळी स्वत:ला वाचविण्यासाठी त्या भाजपत जातील, असे भाकीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

वंचित पुरस्कृत उमेदवार अतिश बनसोडे यांच्या प्रचारार्थ सभेत ते कुंभारवेस येथे बोलत होते. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाला वंचितला साथ देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे यांनी केले. यावेळी अनिल जाधव, डॉ. क्रांती सावंत, अतिश बनसोडे यांची भाषणे झाली.

श्री. आंबेडकर म्हणाले, एका बाजूला काँग्रेसकडून उमेदवाराच्या पळवापळवीचे काम सुरू आहे. काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी मागील वेळी सुशीलकुमार शिंदे यांना जी मते मिळाली तेवढीच मते त्यांना मिळणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचा मतदार कुठेही गेलेला नाही. २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जी मते मिळाली ती सर्व अतिश बनसोडे यांना मिळणार आहेत.

काँग्रेसच्या उमदेवारच्या मताच्या संख्येतील अडीच लाख मते ही मुस्लिम समाजाची आहेत. मुस्लिम समाजाने कोणत्यातरी पार्टीचा कार्यकर्ता होण्यापेक्षा मुस्लिम म्हणून वंचितला मतदान करावे. काँगेसने देशातील तीन राज्यात एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. काँग्रेस हा मुस्लिमांना सुरक्षा देऊ शकत नाही.

सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री असताना सोलापूरच्या पाच मुलांना मध्य प्रदेशात नेण्यात आले. त्यांनतर त्यांचे मृतदेहच हाती आले. मात्र, त्यांची काही चौकशी झाली नाही.

आंबेडकर म्हणाले...

  • काँग्रेसचा मतदार वाढणार नाही, यामुळे वंचितला मतदान करून भाजपला हरवा

  • भाजप निवडून आले तर देशात हुकूमशाही येणार

  • पाच वर्षे घटना पायदळी तुडविताना संसदेत काँग्रेस गप्प का

  • हिजाबला विरोध करण्यात भाजपबरोबर काँग्रसही

  • सर्वांच्या चौकशा सुरू असल्याने काँगेस नेते भाजपला घाबरतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra ST concession: प्रवासी कार्डद्वारेच ऑक्टाेबरपासून सवलत ; एसटीकडून क्यूआर कोड पावती महिनाभर ग्राह्य धरणार

दुबईत सोन्याचं एटीएम लावणारा अशर्फी सेठ कोण होता? दाऊदला ‘डॉन’ बनवण्यात होती मोठी भूमिका

ममता कुलकर्णीचा पुन्हा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का? ९०च्या गाण्यांवर धरला ठेका, Viral Video

Google's Birthday: गुगलचा २८वा बर्थडे! होमपेजवर दिसलं खास Doodle; काय आहे यामागची गोष्ट?

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी अचूक माहिती महत्त्वाची : नितेश राणे

SCROLL FOR NEXT