सोलापूर

सोलापुरातील यंत्रमागांची धडधड सुरु होणार

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले यंत्रमाग कारखाने सुरु करण्यास महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी परवानगी दिली आहे. त्याचवेळी रेडझोनमधील सर्व प्रकारचे उद्योग सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. 

श्री. शिवशंकर यांनी बुधवारी काढलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे, रेड झोनमधील सर्व औद्योगिक घटक सुरु करता येतील. त्याचबरोबर प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्राबाहेरील सर्व विद्युत
यंत्रमाग आणि हातमाग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. तथापि सदर मालाची वाहतूक करणारे कर्मचारी यांना आयएलआय हा आजार नसल्याचे वैद्यकीय दृष्ट्या तपासणी करून खात्री करावी. तसेच त्यांनी मास्क व हॅन्डग्लोव्हज घालणे बंधनकारक आहे. 20 किंवा 20 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण वापरायोग्य अॅप्रन घालणे आवश्यक राहील. तसेच प्रतिबंधित सासंर्गिक क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीला औद्योगिक अस्थापनामध्ये काम करण्यास परवानगी देऊ नये. वैद्यकीय सुरक्षिततेचे तसेच वैयक्तिक सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्सिंग) नियम पाळणे बंधनकारक असेल. 

दुभाजक नसलेले रस्ते शहर भागातील मुख्य रस्ता पूर्व-पश्चिम चालीचा असल्यास दक्षिण बाजूकडील दुकाने सम तारऱेख, तर उत्तर बाजूकडील दुकाने विषम तारखेस आणि मुख्य रस्ता दक्षिणोत्तर असल्यास रस्त्याच्या पूर्व बाजूकडील दुकाने सम तारखेस, तर पश्चिम बाजूकडील दुकाने विषम तारखेस उघडे राहतील. दुभाजक असलेले रस्ते शहर भागातील मुख्य चौकापासून पूर्वेकडून पश्चिमेकडे अथवा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्याच्या मार्गाच्या दिशेने पहिले दुकान विषम तारखेस उघडे राहील. दुसरे दुकान त्याच दिशेने सम तारखेस उघडे राहतील. अशा पद्धतीच्या क्रमाने निश्चित करून दिलेल्या वेळेनुसार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने, अस्थापना रविवारी पूर्णपणे बंद राहतील.

आठवडी बाजार, पान टपऱ्या बंदच राहणार
सोलापूर शहरातील आठवडी बाजार, मॅाल, सुपर बाजार, स्ट्रीट फूड, सर्व प्रकारच्या हातगाड्या, पान टपऱ्या बंद राहणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कारवाई केली जाणार आहे, असेही श्री. शिवशंकर यांनी म्हटले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT