सोलापूर

नीरा फाटा क्रमांक पाच फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा

वाटंबरे (सोलापूर) : चिनके (ता. सांगोला) येथे सोनारसिद्ध मंदिरजवळ सोनारसिद्ध ओढ्यावरील पुलाजवळ कॅनलमध्ये पाणी जास्त झाल्याने नीरा फाटा क्रमांक पाच फुटला. दोन शेतकऱ्यांच्या विहिरीत गाळ गेल्याने 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

पाणी भरपूर प्रमाणात फुगले 
आज सायंकाळी चार वाजता शिवकालीन बंधाऱ्याजवळील 13 नंबर वितरिका उघडलेली होती; परंतु शिवकालीन बंधाऱ्याजवळील वितरिका न उघडल्याने कॅनलमधील माण नदीकडे जाणाऱ्या पाण्याला जीसीबीने बांध घातल्याने पाणी भरपूर प्रमाणात फुगले आणि पाणी जास्त झाल्याने सोनारसिद्ध मंदिरच्या ओढ्यावरचा फाटा क्रमांक पाच फुटून पाणी मोठ्या प्रमाणात वाया गेले. 

शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी 
या पाण्यामुळे देवानंद सुखदेव मिसाळ व महादेव प्रल्हाद मिसाळ या शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी जाऊन विहिरी पूर्णपणे बुजल्या आहेत. त्यांचे 10लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पाणी फुटल्याने सोनारसिद्ध ओढ्याजवळील अनेक शेतकऱ्यांचे बांध वाहून गेले. या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. 

विहीर पूर्णपणे बुजली 
आज चार वाजता नीरा फाटा क्रमांक पाच फुटल्याने माझ्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम चालू होते. 15 दिवस झाले मी विहिरीचा गाळ काढत होतो. कॅनॉलचे पाणी विहिरीत आल्याने माझी विहीर पूर्णपणे बुजली आहे. माझे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. 
- देवानंद मिसाळ, 
चिनके, शेतकरी 

नुकसान भरपाई मिळावी 
नीरा फाटा क्रमांक पाच फुटल्याने माझ्या विहिरीत कॅनलचे पाणी येऊन माझी विहीर पूर्णपुणे बुजली आहे. आता पिकांना पाणी कसे देऊ हेच मला कळत नाही. माझे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. तरी नुकसान भरपाई मिळावी. 
- महादेव मिसाळ, 
चिनके, शेतकरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharmas 2026: 15 मार्चपासून बदलणार ग्रहस्थिती! सूर्य मीन राशीत; का करू नयेत शुभ काम?

स्टार प्रवाहचा झी मराठीला दणका! कमळी, स्वानंदीने स्थान गमावलं; टीआरपी आपटला, पहिल्या स्थानावर कोण?

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

SCROLL FOR NEXT