Loss of students due to lack of classrooms mohol sakal
सोलापूर

वर्गखोल्या नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

मोहोळ तालुक्‍यातील तब्बल १३ गावांमधील शाळांची स्थिती

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ : मोहोळ तालुक्‍यातील विविध गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या धोकादायक स्थितीत आल्याने त्या दोन वर्षांपूर्वी पाडण्यात आल्या आहेत. तालुक्‍यातील १३ गावातील ३६ शाळाखोल्या पाडण्यात आल्या. तेव्हापासून या शाळेतील विद्यार्थी समाज मंदिर, देवाचे मंदिर, वेळप्रसंगी उघड्यावर झाडाखाली ऊन, वारा यांची तमा न बाळगता शिक्षण घेत आहेत. शिक्षणासाठी योग्य व पोषक वातावरण नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हा परिषदेमार्फत विविध शैक्षणिक उपक्रम राबवून जिल्हा गुणवत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी या प्रश्नी लक्ष घालून विषय मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मोहोळ तालुक्‍यातील विविध गावातील जिल्हा परिषद शाळा खोल्या धोकादायक स्थितीत होत्या. पावसाळ्यात पाणी मुरून व अन्य कारणामुळे दुर्घटना घडू नये यासाठी सर्वे करण्यात आला. त्यात एकूण ५१ खोल्या पाडण्यासाठी मंजुरी देण्यात आली. पैकी १३ गावातील ३६ शाळाखोल्या पाडण्यात आल्या. खोल्यांचे पाडकाम होऊन सुमारे दोन वर्षाचा कालावधी लोटला, तेव्हापासून शिक्षक व विद्यार्थी समाज मंदिर, देवाचे मंदिर तर वेळप्रसंगी झाडाखाली उघड्यावर बसून शिक्षण घेतात. यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊन शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.

गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या. आता कुठे त्या सुरू होऊन विद्यार्थ्यांचा सूर लागला आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. पहिल्या खोल्या न बांधता पंधरा खोल्या पाडण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक शाळा डिजिटल झाल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही हा मोठा विरोधाभास आहे. सीईओ स्वामी व शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

समाज मंदिर व इतर ठिकाणी शाळा सुरू असल्याने संगणक, फळा व इतर साहित्य ठेवता येत नाही. बंदिस्त वर्गखोल्या असल्यास एकाग्रतेने शिक्षकांना शिकवता येते तर विद्यार्थ्यांनाही ज्ञान आत्मसात करता येते. वर्ग खोल्यांच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कमी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. वर्गखोल्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे

- नंदकुमार जाधव, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, गोटेवाडी

पाडकाम केलेल्या वर्गखोल्या

वरकुटे वस्ती - १, अंकोली - ४, तरटगाव - १, विरवडे बुद्रुक - ५, गोटेवाडी - ६, तांबोळे - ४, सारोळे - ५ पापरी - २, पासलेवाडी - ५, मनगोळी - ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत गॅस सिलिंडरचा गोलमाल; परस्पर बुकींग नंतर आता डिलिव्हरी न मिळताच आला मेसेज...

चार दिवसांनी निर्माण होणारा गजकेसरी योग 'या' चार राशींना करणार मालामाल ! आनंदाचे दिवस होणार सुरू

Ashadhi Wari: आषाढी वारीत तीन जिल्ह्यांतील सर्व पालखी मुक्कामी ‘जर्मन हॅंगर’; सोलापूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील निविदांचे अधिकार सीईओंना!

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT