Tur. 
सोलापूर

भेसळयुक्त तूर बियाणांमुळे उंडेगावातील शेतकऱ्याचे नुकसान ! तालुकास्तरीय समितीचा अहवाल 

संतोष कानगुडे

पानगाव (सोलापूर) : भेसळयुक्त तुरीच्या बियाणांमुळे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार उंडेगाव (ता. बार्शी) येथील शेतकरी शंकर वसंतराव जगताप यांनी तालुका कृषी अधिकारी, बार्शी यांच्याकडे लेखी दिली होती. त्यावर नेमलेल्या तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने प्रत्यक्ष क्षेत्राची पाहणी करून हे बियाणे 55 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भेसळयुक्त असल्याचे अहवालात नमूद केले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्ग अचंबित झाला असून, विविध प्रकारचे बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या अस्सलतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, की शंकर जगताप या शेतकऱ्याने बार्शी येथील बालाजी ऍग्रो सेंटर या दुकानातून सिद्धांत सीड्‌स जि. औरंगाबाद कंपनीच्या बीडीएन 711 या तूर बियाणांच्या 23 पिशव्या खरेदी केल्या होत्या. 7 जून रोजी त्यांनी शेतामध्ये ठिबक सिंचन प्रणाली वापरून सुमारे 25 एकर क्षेत्रामध्ये तुरीची लागवड केली होती. तसेच या तुरीला इस्रायल खते देखील ड्रीपमधून देण्यात आली आहेत. सद्य:स्थितीतही तूर शेंगा व फुलांच्या अवस्थेत आहे. जसजशी तुरीच्या शेंगांची वाढ होऊ लागली तसतशी जगताप यांना विविध रंगांच्या व कमी- जास्त शेंगा असलेल्या रोपांमुळे शंका येऊ लागली. 

एकाच बियाणांची झाडे वेगवेगळ्या प्रकारची दिसू लागल्याने त्यांनी प्रथम बियाणांची तक्रार बालाजी अग्रो सेंटर, बार्शी यांच्यामार्फत सिद्धांत सीड्‌स कंपनीला केली. परंतु, या कंपनीच्या प्रतिनिधीने लागवड क्षेत्राला भेट देऊन उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे जगताप यांनी तक्रारी अर्जात म्हटले आहे. शेवटी जगताप यांनी तालुका कृषी अधिकारी, बार्शी यांच्याकडे 11 डिसेंबर रोजी रीतसर लेखी तक्रार दिली. त्यानुसार 16 डिसेंबर रोजी कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरचे ए. बी. शास्त्री, बार्शी तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, पं. स. कृषी अधिकारी एस. जे. बुवा, मंडळ कृषी अधिकारी बी. के. पाटील यांच्या तालुकास्तरीय निविष्ठा तक्रार निवारण समितीने प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी करून अहवाल दिला आहे. या अहवालामध्ये पिकाच्या परिपक्वता कालावधीत संपूर्ण क्षेत्रामध्ये फरक दिसून आल्याचे नमूद करत एका क्षेत्रात 55 टक्केपेक्षा जास्त इतर वाण (भेसळ) आढळून आल्याचे म्हटले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT