Love story of Sangita and Gokul 
सोलापूर

संगीता, गोकुळच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर

सुस्मिता वडतिले

सोलापूर : प्रेम म्हटले की, सर्वत्र गुलाबी वातावरण निर्माण झाल्यासारखे वाटते. दोघांच्या चेहऱ्यावर हसू आणि मनात गोडवा जाणवायला सुरवात होते. तशीच प्रेमाची गोड सुरवात संगीता आणि गोकूळ यांची झाली. 
संगीता लहानपणापासूनच मावशीकडे राहायला होती. तिच्या मावशीच्या घरासमोरच गोकूळ राहत होता. सुरवातीला दोघे कधी एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र, जेव्हा मैत्री झाली तेव्हा बोलायला सुरवात झाली. घराच्या समोरच राहत असल्यामुळे घरी येणे-जाणे होत असे. त्यामुळे दोघेजण एकमेकांना ओळखत होते. गोकूळ हे कंपनीत काम करतात. संगीता आणि गोकूळ 2005 ला प्रेमात पडले. सर्व काही अगदी हवे तसेच घडत होते. संगीताची बारावी झाल्यानंतर ती पुण्याला वडिलांकडे गेले. त्यानंतर गोकूळला तिने घरी बोलावले. तोही तिच्या घरी गेला. तिच्या घरी मित्र म्हणून येणारा तो पहिलाच होता. दोन दिवस थांबून तो निघून गेला. असेच अनेक दिवस जात होते. दोघांनाही रोज एकमेकांशी बोलल्याशिवाय करमत नव्हते. त्यानंतर दोघांना एकमेकांची सवय झाली होती. काही दिवसांनी संगीताला न सांगता गोकूळ पुन्हा तिच्या घरी गेला. तो अचानक घरी आल्यामुळे तिला खूप आनंद झाला. मात्र, चेहऱ्यावर आनंद न दाखवता ती शांत होती. सर्वांची जेवणं झाल्यानंतर दोघेजण बाल्कनीत बोलत बसले. बाल्कनीत बोलता बोलता ती त्याला म्हणाली, "मैत्रिणीची आठवण येते की नाही'. तेव्हा गोकूळ म्हणाले, "आठवण येते म्हणून तर भेटायला आलो आहे.' तुला माझी आठवण येते का? असे तिला विचारला. ती लाजून आत निघून गेली. परंतु तिची घरात सांगण्याची हिम्मत होत नव्हती. त्यामुळे घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. हे सर्व तिने तिच्या मोठ्या बहिणीला सांगितले आणि लग्न केले. त्यामुळे फेब्रुवारी 2006 ला दोघांनी मंदिरात विवाह केला. तिच्या वडिलांना जेव्हा हे सर्व माहीत झाले, तेव्हा तिचे वडील म्हणाले, तू अगोदर घरी ये. या सर्व गोष्टी तू सांगितल्या असतं तर आम्ही तुमचे लग्न करून दिले असते. आज त्यांच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाली तर प्रेमाला 16 वर्षे पूर्ण झाली. दोघेजण त्यांच्या दोन मुलांसोबत खूप आनंदी संसार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT