Deisel 
सोलापूर

चोराची कमाल ! चक्क टाकीत पाइप टाकून मोटारीने केली डिझेलची चोरी; माचणूर येथील घटना

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील माचणूर परिसरातील शिवकृपा पेट्रोल पंपाच्या टाकीत पाइप टाकून मोटारीच्या सहाय्याने दीड हजार लिटर (किंमत एक लाख 24 हजार 350 रुपये) डिझेलची चोरी केल्या प्रकरणी अनोळखी इसमाविरुद्ध मंगळवेढा पोलिस गुन्हा ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी विवेक पाटील (वय 40, रा. हरिनयन पार्क, पंढरपूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीचे सासरे शिवाजी पाटील (रा. ब्रह्मपुरी) यांच्या नावावर मंगळवेढा रस्त्यालगत माचणूर हद्दीत एच. पी. कंपनीचा शिवकृपा पेट्रोलपंप असून, त्यावर मॅनेजर औदुंबर पाटील यांच्यासह आठ जण कामावर आहेत. ता. 8 रोजी नितीन तात्यासाहेब बेदरे (रा. बठाण), अंकुश गोसावी (रा. ब्रह्मपुरी) हे कामावर होते. त्याच दिवशी रात्री 11.58 वाजता टाकीतील डिझेलची अँटी मशिनवर तपासणी केली असता 21.0241 होते. 9 फेब्रुवारीला पहाटे 5.15 वाजता काम संपवून घरी गेल्यावर नेहमीप्रमाणे पेट्रोल व डिझेल तपासणी सकाळी 8.15 वाजता केली असता 1500 लिटर डिझेल कमी आढळले. 

मॅनेजरने टाकीला गळती झाली आहे, का याची तपासणी केली असता तसा कोणताही प्रकार आढळून आला नाही. वरील प्रकार फोनवरून मॅनेजर औदुंबर पाटील यांनी सांगितला. त्या वेळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन लगत असलेल्या शेतामध्ये पाहणी केली असता त्या ठिकाणी डिझेल सांडल्याच्या खुणा व रिकामे कॅन आढळून आले. त्या वेळी डिझेल मोटारीच्या सहाय्याने चोरून नेल्याची फिर्यादीची खात्री झाली. याप्रकरणी 1500 लिटर डिझेल चोरी झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस या चोरीचा तपास करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT