madha lok sabha election ram raje nimbalkar mahayuti politics Sakal
सोलापूर

रामराजे पाळणार का महायुती धर्म?

माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राज्यात नव्हे, तर देशात लक्षवेधी ठरली आहे. या मतदारसंघाचे केंद्रबिंदू असणाऱ्या फलटण तालुक्यात मात्र निवडणूक फिव्हर अद्याप म्हणावा असा दिसून येत नाही.

किरण बोळे

फलटण : माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राज्यात नव्हे, तर देशात लक्षवेधी ठरली आहे. या मतदारसंघाचे केंद्रबिंदू असणाऱ्या फलटण तालुक्यात मात्र निवडणूक फिव्हर अद्याप म्हणावा असा दिसून येत नाही. सत्ताकारणासाठी झालेली राजकीय उलथापालथ सर्वसामान्य जनतेच्या पचनी पडल्याचे दिसून येत नाही.

नेतेमंडळी एकीकडे व जनता दुसरीकडे, असे काहीसे चित्र आहे. फलटण तालुक्यातून मताधिक्य घेण्याचा दावा महाविकास आघाडी व महायुतीकडून होत असला, तरी सर्वसामान्य जनताच या निवडणुकीत किंगमेकर ठरणार, हे नक्की.

आजवरच्या येथील निवडणुकांत पाण्याचा मुद्दा नेहमीच कळीचा राहिला आहे; परंतु यावेळी परिस्थिती वेगळी आहे. सत्ताकारणासाठी गेल्या काही काळात लोकप्रतिनिधींनी ज्या- ज्या राजकीय भूमिका घेतल्या, त्या सर्वसामान्यांच्या पचनी पडलेल्या नाहीत.

या राजकीय घडामोडींत ‘निष्ठा’ हा प्रकारच मोडीत निघाल्याने सामान्य जनता, शेतकरी यांच्यात अस्वस्थता आहे. त्यामुळे उमेदवार व राजकीय पक्ष मतदारांना गृहीत धरण्याचा गाफीलपणा करून चालणार नाही. त्यामुळे फलटण तालुक्यातून यंदा कोण मताधिक्य मिळवणार? याबाबत आत्तापासूनच वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

फलटण तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी की ज्येष्ठ नेते शरद पवार यापैकी कोणाचा फॅक्टर चालणार? याबाबत मत-मतांतरे आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार रणजितसिंह यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर सुमारे ८६ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला असला, तरी त्यांना फलटण तालुक्यातून काठावरचे मताधिक्य मिळाले होते.

कोरोना काळातील पहिली दोन वर्षे सोडली, तर उर्वरित तीन वर्षांत त्यांनी पाठपुरावा करून लोणंद-फलटण रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेला. या मार्गावर रेल्वेही सुरू केली. धोम-बलकवडीचे चारमाही कालवे प्रथमतः आठमाही व नंतर बारमाही कसे होतील, यादृष्टीने पावले उचलली.

नीरा -देवघर प्रकल्पाच्या रखडलेल्या कालव्यासाठी बंदिस्त कालव्यास मंजुरी व निधी मंजूर करून प्रत्यक्षात कामासही सुरुवात केली. फलटण-बारामती रेल्वे मार्गाचे काम मार्गी लावले. नाईकबोमवाडी येथे औद्योगिक वसाहत,

जिल्हा सत्र न्यायालय, आरटीओ कार्यालय, सिंचन भवन मंजुरी, शहरांतर्गत पालखी मार्गास निधी, विविध रस्ते, मार्गांसाठी निधीची मंजुरी अशा विविध कामांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे.

या निवडणुकीत त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजना, त्यांनी केलेली विकासकामे व स्थानिक उमेदवार या मुद्द्यांच्या आधारावर फलटण तालुक्यातून लाखाचे मताधिक्य मिळवू, असा त्यांचा आत्मविश्वास आहे. महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे फलटण तालुक्यावर तीस वर्षे एकहाती वर्चस्व आहे.

खासदार रणजितसिंह यांना त्यांचा कडवा विरोध आहे. त्यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या विरोधात उघड भूमिका घेत धैर्यशील मोहिते- पाटील यांची तुतारी हाती घेतली आहे. दुसरे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर लवकरच राष्ट्रवादीत (शरद पवार) प्रवेश करतील, असे बोलले जात आहे.

त्यामुळे रणजितसिंहांना राजे गटाचा विरोध राहणार आहे; परंतु रामराजे, आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे यांनी अद्याप महायुती धर्म पाळणार अथवा नाही? याबाबत भूमिका स्पष्ट केली नाही.

अंतर्गतपणे त्यांच्या राजे गटाने तुतारी फुंकत रणजितसिंहांच्या विरोधात व त्यांना मताधिक्य मिळू नये, यासाठी काम सुरू केल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील हे तालुक्यासाठी नवखे असले तरी, अकलूजचे सरपंच, उपसरपंच, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य, सभापती,

सोलापूर जिल्हा परिषद सदस्य, पक्ष नेता असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. शिवाय राज्यातील मातब्बर राजकीय घराण्यात आजही मोहिते-पाटील घराण्याचा समावेश होतो. मोहिते-पाटील घराण्याचा सोलापूर जिल्ह्यात असणारा प्रभाव फलटणसह माण तालुक्यात असणारे त्यांचे व्यक्तिगत संबंध, दांडगा लोकसंपर्क,

लोकांसाठी सहज उपलब्धता व भाजपबाबत असणारी नाराजी व शरद पवार यांच्याबाबत असणारी सहानुभूतीची लाट या बाबींचा धैर्यशील मोहिते-पाटील यांना विजयासाठी निश्चितपणे फायदा होईल, असाही मतप्रवाह तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT