Kurdu Grampanchyat sakal
सोलापूर

Grampanchyat : माढा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचा कडकडीत बंद

माढा तालुक्यात गेले दाेन दिवस झाले कडकडीत बंद असल्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार पूर्णपणे ठप्प झाला आहे.

वसंत कांबळे

कुर्डू - गावगाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या सर्व ग्रामपंचायती माढा तालुक्यात गेले दाेन दिवस झाले कडकडीत बंद असल्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार पूर्णपणे ठप्प झाला आहे.

ग्रामपंचायतीच्या विविध सेवेवर त्याचा परिणाम झाल्यामुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल झालेले आहेत. बुधवारीही तीन दिवस ग्रामपंचायत बंद राहणार असल्याने पाण्या सह विविध सेवेवर याचा परीणाम झाल्याने ग्रामस्थांचे हाल हाेत आहेत.

अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या संबंधीत सर्वच संघटना यात ग्रामसेवक युनियन DNE 136 महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ 1370 ग्रामरोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य NGP 5775 महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघ Awb/2771/ 2013 महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत व जिल्हा परिषद कामगार संघटना महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना 5102 महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना PN 5139 या गाव गाडा हाकनार्‍य सर्वच संघटना संपावर जात आहेत. या वेळी या सर्व संघटनेचे प्रतिनिधी उपस्थीत हाेते. या सर्वानी तीन दिवस संपात सर्वानी सहभाग नाेंदवला आहे.

आंदाेलकांनी विविध मागन्या शासनाकडे केलेल्या आहेत यात सरपंच संघटन ग्रामपंचायती आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यास आमदार निधीप्रमाणे ग्रा प सदस्य निधी असावा, ग्रामपंचायत सदस्य भत्ता, सरपंच उपसरपंच मानधन थकीत बाकी अदा करावी, त्यात भरीव वाढ व्हावी, मुंबईत सरपंच भवन असावे, छोट्या ग्रामपंचायतींना दरवर्षी किमान दहा लाख रुपये असावा.

ग्रामसेवकांच्या मागन्यात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पद एकत्र करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करावे, ग्रामसेवक कडील अतिरिक्त काम कमी करावीत.

महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक मागण्यात संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून दर्जा देवून 20,000 रुपये वेतन देण्यात यावेत. संगणकपरिचालकांवर नव्याने लादलेली चुकीची टार्गेट सिस्टिम रद्द करावी या सह विविध मागन्यासाठी राज्यातील सर्वच ग्रामपंचायती तीन दिवस बंद पाळणार आहेत. शासनाकडे या मागण्या करूनही दखल न घेतल्या मुळे राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीने बंद पाळलेला आहे.

माढा तालुक्यातील विविध पदाधिकारी यात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे राज्य अध्यक्ष तात्यासाहेब पाटील ,सचीव विजयकुमार माढेकर ,तालुका अध्यक्ष प्रताप गवळी, सचिव नवनाथ दौंड, कार्याध्यक्ष धनाजी परकाळे ,ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष आनंद शेंडे, सचिव सिद्धेश्वर माळी, तानाजी मोहिते, किसन माळी, संगणक परिचालक संघटनेचे जिल्हा सचीव अमीत व्हनमाने, सतीश सरवदे ,ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष मुबारक मुलाणी, सचीव सतीश गायकवाड, दत्तात्रय जगताप या सर्वांनी मिळून माढा तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायती तीन दिवस बंद करण्याचे निवेदन दिले आहे.

मागण्या मान्य न झाल्यास मंत्रावर मोर्चा

ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक सेवक, ग्राम राेजगार सेवक व संगणक परिचलक या सर्व संघटनाने राज्य शासनाकडे भेटून विविध मागण्यासाठी लेखी निवेदन दिले हाेते. परंतु याची दखल न घेतल्यामुळे राज्यातील ग्रामपंचायती तीन दिवस बंद ठेवाव्या लागल्या आहेत. मागण्याची दखल न घेतल्यास लवकरच मंत्रालयावर मोर्चा काढणार.

- तात्यासाहेब पाटील, ग्रामसेवक संघाचे प्रदेशाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसामुळे भलेमोठे झाड १० ते १२ रिक्षांवर कोसळले, तर कुर्ल्यात वीज पुरवठा खंडित, रहिवाशांचे हाल

World Cup 2025 India Squad: वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! १५ जणींच्या संघात कोणाला मिळाली संधी?

New Luggage Rules : विमान प्रवासाप्रमाणे रेल्वेतही लागू होणार 'लगेज नियम', अतिरिक्त साहित्य घेऊन जाणं पडणार महागात...नेमका निर्णय काय?

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : पुणे ते मुंबई जाणारी डेक्कन एक्स्प्रेस मुसळधार पावसामुळे रद्द!

Mumbai Rain Alert: घाटकोपर-अंधेरी लिंक रोड बंद; साकीनाका परिसरात पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT