Mahadev and Sahadeva temple of Chandragupta Maurya period solapur 
सोलापूर

चंद्रगुप्त मौर्यांच्या कालखंडातील महादेव व सहदेव मंदिर

पुरातत्त्व विभागाकडून सावळेश्‍वर येथील प्राचीन हेमाडपंती मंदिराचे संशोधन करण्याची गरज

विकास खिलारी

सावळेश्वर - येथे प्राचीन काळातील महादेव व सहदेव यांची हेमाडपंती मंदिरे असून, याचे संपूर्ण बांधकाम दगडामध्ये बांधलेले आहे. अशाच प्रकारे भारताच्या विविध भागांत अनेक प्राचीन मंदिरे पाहावयास मिळतात. केरळपासून काश्मीरपर्यंत, पश्चिमेला गुजरातपासून पूर्वेकडे आसामपर्यंत असलेली विविध वास्तुशैलीतील मंदिरे म्हणजे भारताचा एक महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहे. सावळेश्‍वर (ता. मोहोळ) येथेही असेच मंदिर असून, त्याचे जतन करणे काळाची गरज आहे.

स्थानिक जाणकारांच्या मते, हे मंदिर चारशे वर्षे जुने आहे, तर काहींच्या मते हे मंदिर त्याहीपेक्षा पुरातन असून याचे गर्भगृह आठ फुटांचे तर महादेव पिंडीची लांबी तीन फूट व रुंदी दोन फूट तर पिंडीची उंची एक फूट आहे. मंदिरांच्या खांबावर तसेच प्रवेशद्वारासमोर काही अक्षरे लिहिली आहेत, यावरून याचा बोध होण्याची शक्यता आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाने संशोधन करून या मंदिराची डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. याबद्दल इतिहासाचा अभ्यास करून अधिक बारकाईने संशोधन केल्यास मोठा ऐतिहासिक ठेवा हाती लागेल, यात शंकाच नाही. प्रत्येक वर्षी नागपंचमी दिवशी येथे नागोबाची पूजा केली जाते. गावातील सर्व जातिधर्मातील महिला एकत्रित येऊन नागोबाची गाणी म्हणत पिंगा खेळतात. त्या दिवशी मंदिरात मोठी यात्रा भरते. मंदिरातील वाळू लोक घेऊन जातात आणि आपल्या घराच्या परिसरात ती टाकतात. त्यामुळे परिसरात साप निघत नाही व दिसतही नाही, अशी प्राचीन काळपासून चालत आलेली श्रद्धा आहे.

मंदिराची वैशिष्ट्ये

  • मंदिराची उभारणी करताना कुठेही वाळू व सिमेंटचा वापर दिसत नाही

  • सहा ते आठ फुटांच्या दगडी शिळा लावून करण्यात आली महादेव मंदिराची उभारणी

  • मंदिराच्या छतावर माती आहे परंतु पावसाळ्यात ते गळत नाही, हे विशेष

  • मंदिराचा गाभारा वगळता पुढील बाजूस मोकळी हवा खेळत असल्याने उन्हाळ्यात त्या ठिकाणी जाणवत नाही उकाडा

हे मंदिर फार प्राचीन काळातील असून, चंद्रगुप्त मौर्य यांच्या कालखंडातील असण्याची शक्यता आहे. मंदिर पूर्ण हेमाडपंती बांधकामाचे असून, पुरातत्त्व विभागाने या मंदिराचे जतन व संवर्धन करणे आवश्‍यक आहे.

- रामेश्वर जोकार, मंदिराचे पुजारी, सावळेश्वर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT