Koli Samaj andolan 
सोलापूर

दोषी अधिकारी, ठेकेदाराला अटक करा ! कुंभार घाट दुर्घटनाप्रकरणी महादेव कोळी समाजाचे आंदोलन 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : दोषी अधिकारी आणि ठेकेदारास अटक झालीच पाहिजे, संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, मृतांच्या वारसांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत कार्तिकी वारीनिमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेस पंढरपूरला येत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कोळी समाजबांधवांनी केला. 

येथील कुंभार घाटालगतची भिंत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत सहा जणांचा बळी जाऊन महिना-दीड महिना उलटून गेला आहे. तरी अद्याप या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषी अधिकारी आणि ठेकेदाराला अटक झालेली नाही. शासनाने मृतांच्या वारसांना जी मदत जाहीर केली त्याची संपूर्ण पूर्तता झालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महादेव कोळी समाजाने आज कुंभार घाटाजवळ दुर्घटना घडलेल्या ठिकाणी घोषणा देत आंदोलन केले. 

महर्षी वाल्मीकी संघाचे संस्थापक-अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या वेळी माजी नगराध्यक्ष बाबासाहेब अधटराव यांच्यासह समस्त कोळी समाजातील लोकांनी प्रशासन व शासनाविरुद्ध आक्रोश व्यक्त केला. 

या वेळी गणेश अंकुशराव म्हणाले, की या दुर्घटनेत बळी गेलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. पवार हे आले होते. तेव्हा त्यांनी दिलेल्या आश्‍वासनापैकी मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत मिळाली आहे; परंतु मृतांच्या वारसांना मंदिर समितीमध्ये नोकरीस घेणे, महापुरात वाहून गेलेली घरे पुन्हा नवीन ठिकाणी जागा उपलब्ध करून बांधून देऊ, ठेकेदार व अधिकाऱ्यांची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर काररवाई करू, मृतांच्या वारसांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊ या आश्‍वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही. याची दखल कार्तिकी वारीच्या महापूजेस आल्यास श्री. पवार यांनी करावी, अशी मागणी श्री. अंकुशराव यांनी केली. 

या वेळी पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब अधटराव, गणेश अंकुशराव, सतीश नेहतराव, मारुती संगीतराव, अनिल अभंगराव, धनंजय कोताळकर, कुमार संगीतराव, श्रीमंत परचंडे, मोहन सावतराव, दत्तात्रय अधटराव, बाबासाहेब अभंगराव, सचिन अभंगराव, नितीन अभंगराव, दत्ता माने, अरुण कांबळे, नानासाहेब करकमकर, उमेश संगीतराव, चंद्रकांत अभंगराव, नितीन अधटराव, सूरज कांबळे, सोमनाथ अभंगराव, वैभव अभंगराव, रणजित कांबळे, अमर परचंडे, गणेश तारापुरकर, विनायक संगीतराव, संजय कोळी, अमर ननवरे, संतोष कोळी, राजू ननवरे, धीरज करकमकर, गणेश कोळी, प्रशांत शिरसट, सोमा कोळी आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT