स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख (आबा) यांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये केलेले कार्य चिरकाल राहावे. महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये कायम त्यांचे कार्य स्मरणात राहील यासाठी विधानसभेचे स्मृतिपत्र प्रदान करण्यात आले
सांगोला : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या कार्याचा उल्लेख करून विधानसभेचे स्मृतीपत्र आमदार शहाजी पाटील यांच्या हस्ते शनिवार (ता. 16) रोजी स्वर्गीय आबांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी रतनबाई देशमुख, पुत्र चंद्रकांत देशमुख, नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे देण्यात आले. स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख (आबा) यांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये केलेले कार्य चिरकाल राहावे. महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये कायम त्यांचे कार्य स्मरणात राहील यासाठी विधानसभेचे स्मृतिपत्र प्रदान करण्यात आले आहे. याअगोदर महाराष्ट्र विधानमंडळ यांनी त्यांना भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते यापूर्वीच 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित केले आहे.
विविध संस्थाकडूनही त्यांच्या कार्याची दखल घेत विविध पुरस्कार मिळालेले आहेत. एकाच मतदारसंघांमध्ये सलग अकरा वेळा प्रतिनिधित्व करून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोन वेळा मंत्री म्हणून केलेल्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांचे कार्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या कायम स्मरणात राहील यासाठी त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या कार्याचा उल्लेख करून स्मृतीपत्र दिले आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांच्या हस्ते त्यांच्या पत्नी रतनबाई गणपतराव देशमुख, त्यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख व नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन स्मृतीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सांगोल्याचे तहसीलदार अभिजीत पाटील, सांगोला नगरपरिषदेची माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांच्यासह देशमुख कुटुंबीय उपस्थित होते.
स्वर्गीय गणपतराव देशमुख यांना मिळालेले पुरस्कार -
- नवी दिल्ली - बेस्ट सिटीजन ऑफ इंडिया
- 2003 - क्रांतीसिंह नाना पाटील पुरस्कार
- 2004 - सार्वजनिक वाचनालय नाशिकचा 'कार्यक्षम आमदार' पुरस्कार
- 2007 गांधी फोरम संघटना दिल्लीचा 'आदर्श समाजसेवक' पुरस्कार
- 2009 - तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा 'जीवनगौरव पुरस्कार'
- 2010 - महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्यादित मुंबई यांच्या वतीने 'वस्त्रोद्योग महर्षी' पुरस्कार
- 2014 - 'रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार'
- 2017 - भारती विद्यापीठ पुणे यांच्या वतीने 'जीवन साधना गौरव पुरस्कार'
- 2018 - अग्निपंख फाउंडेशन तर्फे 'डॉ. ए पी जे अब्दुल कलाम जीवनगौरव पुरस्कार'
- 2020 - किसनवीर सहकारी साखर कारखाना, सातारा यांच्या वतीने 'आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.